यवतमाळ राजकीय सामाजिक

दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रिकल ट्रायसायकलचे वितरण

दारव्हा प्रतिनिधी पंकज परिहार 

दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रिकल ट्रायसायकलचे वितरण

आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून नेर, दारव्हा व दिग्रस तालुक्यात ३७८ दिव्यांगाना लाभ

यवतमाळ : दिव्यांगांना आत्मनिर्भर आयुष्य जगता यावे आणि त्यांना स्वयंरोजगार करण्यास मदत व्हावी, यासाठी आमदार संजय राठोड यांच्या प्रयत्नांतून नेर, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील पावणेचारशे दिव्यांगाना इलेक्ट्रिकल ट्रायसायकल वितरित करण्यात आल्या. नेर येथे शनिवारी आमदार संजय राठोड यांच्या हस्ते या ट्रायसायकलचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा पवार उपस्थित होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ द्वारा लोकसंचालित साधन केंद्र व नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत दिव्यांग महिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रिकल ट्रायसायकल देण्यात आल्या. या इलेक्ट्रिकल ट्रायसायकल फिरते विक्री केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग महिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना विविध व्यवसाय करता यावा आणि हे कुटुंब आत्मनिर्भर व्हावे, असे मनापासून वाटत होते. याच विचारातून दिव्यांगांना इलेक्ट्रिकल ट्रायसायकल देण्याची संकल्पाना मूर्त रूपात आली, असे यावेळी बोलताना आ. संजय राठोड म्हणाले. स्टेशनरी, भाजीपाला विक्री, टी स्टॉल, रेडीमेट गारमेंट, डेलीनीड्स, किराणा इत्यादी व्यवसाय करून आता हे दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत, असे यावेळी राठोड म्हणाले. स्वयंरोजगार करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ट्रायसायकलसोबतच दिव्यांगाना यावेळी प्रत्येकी पाच हजार रूपयांचे साहित्यही देण्यात आले. दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात ९०० इलेक्ट्रिकल ट्रायसायकल वाटप करण्योच उदिृष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्या्रत नेर तालुक्यात १२४, दारव्हा तालुक्यात १४४ व दिग्रस तालुक्यात ११० अशा एकूण ३७८ दिव्यांगांना ट्रायसायकलचे वितरण करण्यात आले.
आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांच्या आत्मनिर्भरतेकरीता साकारलेली ही योजना नाविन्यपूर्ण आहे. यवतमाळ पॅटर्न म्हणून हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी बोलताना दिली. या योजनेतील महिलांना बचत गटांमध्ये सामावून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आ. संजय राठोड यांनी हा संकल्प पूर्णत्वास नेला, याबाबत ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, नेर पंचायत समिती सभापती मधूमती चव्हाण, दारव्हा पंचयात समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, दारव्हा नगराध्यक्ष भाऊसाहेब इरवे, माविमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे, हरिहर लिंगनवार, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, मनोज सिंगी, उत्तम ठवकर, सुधीर देशमुख ,भाऊराव ढवळे, नामदेव खोब्रागडे, दीपक आडे, सागर पुरी यांच्यासह दारव्हा दिग्रस नेर येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Copyright ©