यवतमाळ सामाजिक

लग्नाच्या आनंदावर विरजण पडलेल्या आंतरजातीय अनाथ दाम्पत्याला मिळाली पाटणकरांची सावली..!

लग्नाच्या आनंदावर विरजण पडलेल्या आंतरजातीय अनाथ दाम्पत्याला मिळाली पाटणकरांची सावली..!
———————————————
दोन मुलींनीही अनुभवला आई वडीलाचा लग्न सोहळा.
———————————————
तीन वर्ष देवाला साक्षी ठेवून पती- पत्नी म्हणून राहीले होते बनून.
———————————————
यवतमाळ-खरी अनाथांची सावली, आज डोळे भरून पहायला मिळाली. हा आनंदाचा क्षण केवळ एक गोष्ट नसून यवतमाळ तालुक्यातील घाटाणा (लोणी) येथिल ज्यांनी आपल्या नशिबी लग्ना सारखा आनंदाचा क्षण नाही. त्यांनी देवालाच मनात साक्षी ठेवून चक्क तीन वर्ष पती पत्नी म्हणून संसार थाटला होता त्यांच्या जीवनातील गेलेला हा आनंद त्यांना मिळावा म्हणून प्रयास बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा व अनाथ गरजू गरिबांची माय माऊली नीलिमाताई पाटणकर यांनी एक आगळा वेगळा या दाम्पत्याचा आंतरजातीय विवाह सोहळा पार पाडला.
घाटाणा येथिल विशाखा तुळशीराम फुपरे हिचे लहानपणीच आई वडील दोघेही मरण पावल्या नंतर ती अनाथ झाली. तिचे उदर पोषण तिच्या गरिबीत जीवन जगणाऱ्या म्हाताऱ्या आजीकडे झाले. अश्यातच गावातीलच अनिल मोहन राठोड या युवकासोबत प्रेम संबंध प्रस्थापित झाले. यात या प्रेमी युगुलानी लग्न करण्याचे ठरविले. मात्र तशी परिस्थिती नाही. त्यातही समाज काय म्हणेल या विचारातून त्यांनी गावातून पलायन केले व देवाला मनात साक्षी ठेवून पती पत्नी म्हणून राहू लागले अश्यातच त्यांच्या संसारवेलीवर दोन अपत्य फुलले त्याही दोन्ही मुलीच आता आपणास समाज काही म्हणणार नाही. असे मोठे मन करून ते परत आपल्या जन्म भूमीत परतले. सर्व तर बरे पण प्रत्येकांच्या जीवनात एकदाच जो आनंदाचा क्षण येतो तो विवाह आणि तो क्षण विशाखा व अनिल यांच्यावर विरजण घेवून आल्यासारखे होते ही बाब अनाथांची माय म्हणून परिचित असलेल्या सामाजिकदृष्ट्या दीनदुबळ्यांना मदत करणाऱ्या, कोरोना काळात अनेक निराधार व गरजूंना चार महिने भोजनदान करणाऱ्या अश्या प्रयास बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा नीलिमाताई पाटणकर यांना माहिती पडताच त्यांनी त्यांना दत्तक घेऊन या प्रेमी युगुलाचा मोठ्या थाटात त्यांच्या संस्कृतीतील रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा पार पाडला. आणि त्यांनी स्वतः कन्यादान केले. यावेळी वधू वरास शुभ आशिर्वाद देण्याकरिता संत सावता माळी नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष आत्माराम जाधव,विठ्ठल भाग्यवंत मुख्य कार्य. अधि. पुसद, सरपंच विकास सुरपाम, ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच श्रमिक बहु. संस्थेच्या अध्यक्षा करूनाताई विरकर, रवींद्र विरकर, माणिकताई पांडे, सामाजिक कार्यकर्ते रेखाताई कोकाडे, रंजनाताई दूधकोहळे, संजयजी चव्हाण, जनार्धन राठोड, प्रतिक जोग, अतुल पवार या मान्यवरांसह बहुसंख्य महिला पुरुषांची उपस्थिती होती. आश्चर्याची बाब म्हणजे हीच की भाग्यवान त्या दोन मुली विशाखा आणि अनिल च्या संसार वेलीवर फुलून त्यांनी आपल्या आई वडिलांचे लग्नात हजर राहून या आनंदित सोहळ्याचा आनंद घेतला. अक्षरशः या सोहळ्यात कन्यादान करतांना बहुतांश महिलांच्या डोळ्यातील अश्रू अनावर होताना दिसले. या अनोख्या विवाहाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.

Copyright ©