यवतमाळ सामाजिक

इमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून जनतेची दिशाभूल.

 दारव्हा प्रतिनिधी दत्ता खोपे

इमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून जनतेची दिशाभूल.
——————————————–
दारव्हा-यवतमाळ येथिल महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ कार्यालयात गरजावंत जनता संपूर्ण कागद पत्रांची पूर्तता करून आपले नांव ऑन लाईन द्वारे नोंदणी करण्यासाठी जातात. त्या ठिकाणी दोन ते तीन वेळा ऑन लाईन केल्यानंतरही ते संबधित ठेकेदारांनी नाकारले असे म्हणून मॅसेज पाठवून जनतेची दिशाभूल केल्या जात आहेत.
हाताला रोजगार नाही. कोरोना महामारीच्या सावटाखाली वावरणाऱ्या कामगारांना कसेबसे काम मिळते त्यात त्यांच्या कुटुंबाचे गुजराण चालविवावे लागते ही बाब हेरून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन स्तरावरून कामगार नोंदणी करून त्यांना साहित्यासह आर्थिक सहाय्य केल्या जाते. मात्र संबधित विभागाच्या वेळ धोरणाने व जाचक अटींमुळे जनता वैतागली असून वारंवार या कार्यालयात चकरा मारून सुध्दा काहीतरी कारणे दाखवून त्यांना या योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याची ओरड दारव्हा तालुक्यातील जनता करीत आहे. यामध्ये मुरली बोरखाडे, संतोष माहूरे, किसनराव गावंडे, गुल्हाने, शक्ती वानखडे, विनोद रायकर यांचे सह बहुसंख्य जनते सोबत असा प्रकार घडला असून संबंधित विभागाच्या वेळ काढू कर्मच्यारयामुळे या लाभार्थ्यांना कार्ड पासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांना वारंवार येजा करून आर्थिक भुर्दंड सोसून सुध्दा पदरी निराशाच पडली. या गंभीर बाबीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून दारव्हा तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©