नागपूर सामाजिक

बेला ग्राम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार…

बेला ग्राम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार…
—————————————-
हेतूपुरस्पर नागरिकांच्या अधिकारावर आणल्या जातोय गदा
——————————————–
मालकी हक्कातील बांधकाम पाडण्याची धमकी.
—————————————-
उमरेड- तालुक्यातील बेला ग्राम पंचायत अंतर्गत रितसर मालकी हक्काच्या जागेवर बांधकामासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वारंवार परवानगी मागून सुध्दा हेतूपुरस्पर परवानगी न देता नागरिकांच्या अधिकारावर गदा निर्माण करून केलेले बांधकाम ते पाडून टाकण्याच्या धमकी वजा अफलातून कारभार उघडकीस आला आहे.
बेला ग्राम पंचायत हद्दी मधील रहिवासी असलेले उच्च शिक्षित कैलास साठवणे यांनी पै- पै पैसा जमवून प्लॉट खरेदी केले. व राहण्यासाठी व आपले छोटे मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी दिनांक २५ मे २०२१ ला ग्राम पंचायत बेला येथे रितसर आवश्यक कागदपत्रासह बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. मात्र कित्येक महिने लोटल्यानंतरही परवानगी दिली नाही किंवा त्यावर कुठलीही लेखी अथवा तोंडी माहिती दिली नाही. त्यानंतर त्यांनी परत दिनांक ३ डिसेंबर २०२१ ला आवश्यक कागदपत्रे सादर करून बांधकाम परवानगी साठी विनंती केली. मात्र येथिल निगरगट्ठ प्रशासनाने हेतुपुरस्पर परवानगी न देता साठवणे यांना केवळ मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्रस्त कैलास साठवणे यांनी आपण रितसर बांधकाम परवानगी मागितली होती ती मिळाली असावी असे समजून बांधकामास सुरुवात केली असता ग्राम पंचायतीला हे चांगलेच खटकले त्यांनी साठवणे यांना पूर्णपणे खचवून टाकण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना अधिकाराचा गैरफायदा घेत हे बांधकाम थांबवावे अन्यथा ते पाडण्यात येईल यासाठी लागणारा खर्च सुध्दा आपणासच द्यावे लागेल या आशयाचे पत्र देवून दम भरला. या मागील कारण साठवणे यांनी शोधले असता येथिल मुख्य रस्त्याचे बांधकामात ग्राम पंचायतीने ४ फूट जागा दान मागितले परंतु मिच गरिबीत माझ्या हक्काची जागा कशी देणार म्हणत ही मागणी त्यांनी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी ही जागा ग्राम पंचायतीची असल्याचा दावा करत १० नोटिसा बजावून पोलीस प्रोटेक्शन मध्ये भूमि अभिलेख विभागामार्फत मोजणी ठरवून त्यांचे घर पाडण्याचे ठरविले. मात्र यात सत्य उघड येत एवढी मोठी यंत्रणा खोटी ठरत ही जागा अतिक्रमित नसून साठवणे यांच्या मालकीचीच निघाली त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली होती. हाच वचपा काढण्यासाठी परवानगी न देणे माहिती मागितली असता ते नाकारणे. बांधकामास सुरुवात केल्यावर ते पाडून टाकण्यासाठी धमकी देणे हा प्रकार वाढला असून या ग्राम पंचायती मध्ये कोणतेही नियम, कायदे नसल्याचे दिसून येत आहे. केवळ मनमानी कारभार वापरून साठवणे यांना मानसिक त्रास देणे सुरू केले आहे. एकदा निवडणूक झाली त्यातून सरपंच निवड झाली की तो सरपंच सर्व गावकऱ्यांना समान वागणूक देवून त्यांचे हक्क त्यांचा अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. परंतू मागील काही द्वेषाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्न करायला नको. असे मत साठवणे यांनी व्यक्त केले असून याठिकाणी एका सुशिक्षित व्यक्तीस एवढा त्रास होत असेल तर गोर गरीबांचे काय? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येथिल अनागोंदी कारभारवर जिल्हाधिकारी यांचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी तथा पोलीस विभागाने लक्ष घालून येथिल प्रशासनाला वठणीवर आणावे व माझे बांधकाम पाडण्याची धमकीचे जे पत्र मला दिले त्यापासून मला संरक्षण द्यावे व माझा अधिकार मला प्रदान करावा असे कैलास साठवणे यांनी प्रसिध्दी पत्रातून केली आहे.

Copyright ©