यवतमाळ सामाजिक

आ. संजयभाऊ राठोड (माजी मंत्री): अपंगांचा आश्वासक आधार..

दारव्हा प्रतिनिधी दत्ता खोपे

आ. संजयभाऊ राठोड (माजी मंत्री): अपंगांचा आश्वासक आधार..

आज मा. आमदार संजयभाऊ राठोड यांच्यामुळे दिव्यांगांच्या चेहर्‍यावर हास्यकळ्या उमलल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नेर, दारव्हा व दिग्रस तसेच यवतमाळ तालुक्यातील नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता इलेक्ट्रिक ट्रायसायकल व फिरते विक्री केंद्र स्वयंरोजगार व्यवसाय कीट वाटप ही अनोखी संकल्पना मा. आमदार संजयभाऊ राठोड यांच्या कल्पनेतून प्रत्यक्षात साकारल्या गेली.

पालकमंत्री असताना आमदार संजयभाऊ राठोड यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना स्वावलंबी बनवून आत्मसन्मानाने जीवन जगता यावे याकरिता ई-ट्रायसायकल व उदरनिर्वाहासाठी व्यवसाय कीट वाटप करण्याचा निर्धार केला होता. आणि आज या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनेला मूर्त रूप प्राप्त होऊन जात, धर्म, भाषा यांचा विचार न करता केवळ दिव्यांगांच्या स्वाभिमानाचा विचार करून त्यांनाही या समाजामध्ये अभिमानाने व सन्मानाने जगता यावं हा विचार नजरेसमोर ठेवून दिग्रस मतदार संघातील सर्वच दिव्यांगांना ई-ट्रायसायकल व व्यवसाय कीटचा लाभ झाला. या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती, महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे त्या ई-ट्रायसायकलवर विविध व्यवसाय करणार. जसे की स्टेशनरी, भाजीपाला विक्री, टी-स्टॉल, रेडिमेड गारमेंट, डेलिनिड्स, किराणा इ. व्यवसाय करून स्वतः आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
ई-ट्रायसायकल मिळाल्यावर दिव्यांगांच्या चेहर्‍यावर आत्मसन्मानाचा आनंद दिसत होता. कळत नकळतपणे आमदार संजयभाऊ राठोड यांच्यामुळे दिव्यांगांच्या चेहर्‍यावर हास्यकळ्या उमलल्या.

यापूर्वीही आमदार साहेबांनी जयपूर फुट, शिलाई मशीन, कापसापासून वाता बनविण्याची मशीन असे कितीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदार संघातील गरजूंना मदत केली. या आणि अशा कितीतरी आश्वासक कार्याच्या माध्यमातून अनेकांना आमदार मायेचा आधार दिल्यामुळेच आमदार संजयभाऊ राठोड एक आश्वासक आधार ठरल्याचे बोलल्या जात आहे.

Copyright ©