यवतमाळ सामाजिक

पारवा येथे टेनिस खन्ना बॉलचे खुले सामने..

पारवा येथे टेनिस खन्ना बॉलचे खुले सामने..
———————————————
घाटंजी-तालुक्यातील पारवा येथे स्व. तुळशीराम बहुउद्देशिय मागासवर्गीय विकास संस्था र. नं.४४९८/९८ यांच्या वतीने व स्व. निलेश देशमुख पारवेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्रीडा रसिकाकरिता दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ पासून क्रिकेट सामन्यांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर करण्यात आले आहे.
या सामन्याचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, माजी जि. प. सदस्य स्वामीबाबू काटपेल्लीवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पवार, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, जि. प. सदस्य आशिष लोणकर, बाजार समितीचे सभापती तथा पं. स. सदस्य अभिषेक ठाकरे, संतोष जैस्वाल, जयवंतराव चिल्लावार, दिपक वाघुलकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सामन्यात प्रथम बक्षीस ३१,००० हजार रुपये बी. आर. सी. सी. मंडळाकडून, द्वितीय बक्षीस २१,००० हजार रुपये शेख अखिल भाई व गणेश आस्वले यांचे कडून तृतीय बक्षीस १५,००० हजार रुपये सय्यद आक्रोश, विठ्ठल गवारदिवे, दिनेश चव्हाण, विनोद प्रधान, संदीप देशमुख यांचे कडून तर चतुर्थ बक्षीस ११,००० हजार रुपये स्व. तुळशीराम बहुद्देशीय मागासवर्गीय विकास संस्था पारवा यांचे तर्फे देण्यात येणार असून व्ययक्तीक बक्षिसांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आले आहे. तरी या आयोजित सामन्यात सहभागी होवुन आपल्यातील क्रीडांगनावरील सुप्त गुणांचा प्रदर्शन करण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता तालुक्यासह तेलंगणा, मराठवाडा मधील क्रिकेट प्रेमींनी आप आपला संघ घेवून यात सहभाग नोंदवावा असे आवाहन पारवा येथिल क्रिडा प्रेमी, पंच कमेटी, मार्गदर्शन कमेटी, युवा मंडळ तसेच सदस्य गण व सामन्याचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ मुद्देलवार व मित्र परिवार यांनी केले आहे.

Copyright ©