यवतमाळ सामाजिक

दोन वर्षांपासून पायाला असलेल्या जखमेने त्रस्त रुग्ण प्रेमिला खंडाळेला मिळाला डॉ. दुधे चा आधार. 

 दारव्हा प्रतिनिधी दत्ता खोपे

दोन वर्षांपासून पायाला असलेल्या जखमेने त्रस्त रुग्ण प्रेमिला खंडाळेला मिळाला डॉ. दुधे चा आधार. 
———————————————
दारव्हा-तालुक्यातील इतना येथिल प्रेमिला खंडाळे हिच्या पायाला दोन वर्षांपूर्वी जखमा झाल्या. यात त्या जखमांचा त्रास वाढीस जावू लागला. त्यामध्ये त्यांना महागडा इलाज करून घेणे परिस्थितीला झेपावणारे नव्हते. तरीसुद्धा जमेल तिथून उधार उसनवार करून कधी यवतमाळ तर दिग्रस एव्हाना सेवाग्राम गाठत सतत दोन वर्ष इलाज सुरू ठेवला मात्र त्यांची जखम बसता बसेना उलट या जखमेचा फैलाव होत या जखमेत गँगरीन निर्माण झाली. यात रुग्ण प्रेमीला पुर्णतः वैतागल्या जवळ पैसाही नाही. अश्यातच त्यांना कोणीतरी डॉ. राहुल दुधे यांचे नाव सांगितले. कायतर एवढे तरी करून घ्यावे या नैराश्यातून त्या डॉ. राहुल दुधे यांच्या दवाखान्यात दाखल झाल्या व आपल्या जखमेचा पाढा वाचला. आणि दोन वर्षांपासून चालू असलेला आटापिटा कथन केले. त्यानंतर डॉ. दुधे यांनी जखमेची पाहणी करून रुग्ण प्रेमीलाला धीर दिला. आणि त्यांच्यावर इलाज सुरू केला. आज ती जखम नव्वद टक्के बरी झाली असून पुर्णतः दुरुस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर डॉ. दुधे यांनी या रूग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून स्वतःकडील महागड्या गोळ्या औषधी व इंजेक्शन मोफत दिल्या त्यामुळे प्रेमिलाला मोठा दिलासा मिळाला असून आता आपण जिवन जगू शकणार अशी आशा तिची पल्लवित झाली आहे. त्यांना डॉ. दुधे मिळाले नसते तर तिच्या जखमेने कोणते रूप धारण केले असते ते याठिकाणी कल्पना सुध्दा करविल्या जात नाही. त्यामुळे खरी रुग्ण सेवा देणारे डॉ. दुधे यांचे त्यांनी शतशा आभार मानले असून या डॉक्टर महोदयाची संपूर्ण परिसरात वाह, वाह की होताना दिसत आहे.

Copyright ©