यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत बांधकाम केलेल्या दुकान गाळ्यांचा लोकार्पण सोहळा.

जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत बांधकाम केलेल्या दुकान गाळ्यांचा लोकार्पण सोहळा.
———————————————
ग्रामीण भागातील उद्योजक व बचत गटांना दुकान गाळ्यांचा लाभ होणार…
– जि. प.अध्यक्षा सौ. कालिंदाताई पवार..
———————————————
यवतमाळ- आर्णी येथील जिल्हा परिषदेच्या खुल्या जागेमध्ये 12 दुकान गाळ्याचे दर्जेदार बांधकाम करण्यात आलेले आहे. या बांधकामाकरिता 97 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता, काम पूर्ण झाल्यानंतर दुकान गाळ्याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षा माननीय सौ. कालींदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. रामभाऊ देवसरकर सभापती अर्थ व बांधकाम , सौ.जयाताई पोटे, सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद यवतमाळ, सौ.स्वातीताई येंडे जिल्हा परिषद सदस्य सौ.किरणताई मोघे जिल्हा परिषद सदस्य, कार्यकारी अभियंता बांधकाम क्रमांक-२ श्री येवले साहेब, उप अभियंता श्री.कुटे साहेब, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते,
अतिशय कमी वेळात आणि दर्जेदार स्वरूपाचे काम केल्यामुळे लोकार्पण प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये सौ.कालींदाताई पवार यांनी संबंधित यंत्रणेचे कौतुक केले व ग्रामीण भागातील उद्योजक तसेच बचत गटांना निर्माणाधिन दुकान गाळ्यांचा लाभ होणार असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी पंचायत श्री गोविंद इंगोले यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णी पंचायत समिती कर्मचारी श्री. चोपडे साहेब शाखा अभियंता वेळुकर शाखा अभियंता पाटील सहाय्यक प्रशासन अधिकारी विकास गुल्हाने, चौधरी वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद माकोडे, यांच्यासह अनेक कर्मचारी हजर होते. कोरोना नियमाचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

Copyright ©