यवतमाळ सामाजिक

विश्वमांगल्य सभेतर्फे गानकोकिळेस श्रद्धांजली

विश्वमांगल्य सभेतर्फे गानकोकिळेस श्रद्धांजली

ॲड
विश्वामांगल्य सभा शाखा यवतमाळ तर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना यवतमाळ कार्यालयात मासिक बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यवतमाळ अध्यक्षा ॲड.सौं शुभांगी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात संपूर्ण कार्यकारिणी सदस्या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वसंत ऋतुचे आगमन पृथ्वी तलावर होत असताना च सरस्वतीचा आशिर्वाद असलेली ही गानकोकिळा ब्राह्मलीन होणे हे समस्त भारतवासियांना, विदेशातील त्यांच्या सर्व रसिक प्रेमिना मनाला चटका लावून देणारे ठरले.. पुढे बोलताना त्यांनी लतादीदीच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला, वडिलांच्या अकाली निधनानंतर लहानग्या लतावर सर्व कुटूंबिया ची जबाबदारी आली त्याकरिता त्या कोल्हापूरला येऊन मनात नसताना ही चित्रपटा त काम करावे लागले. या प्रवासात त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले, वेळ प्रसंगी अपमान ही सहन करावा लागला.. मात्र त्यांच्या दोन गोष्टी बदलल्या नाही आणि त्या म्हणजे देव, देश, धर्मा वरचा अढळ विश्वास आणि वडिलांच्या आठवणीची अत्तरकुपी… याच गोष्टीमुळे मंगेशकर कुटुंबाना अनेक कठीण प्रसंगातून तारून नेले… आज आपल्या मध्ये त्या नाहीत परंतु मेरी आवाज ही पहचान है l या त्यांच्या गाण्यातील शब्दाप्रमाणे, गीत रूपाने त्या अखेरपर्यंत आपल्या सोबतच राहतील … शेवटी त्रिवार सत्य हेच की जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला असे बोलत अध्यक्षा सौं शुभांगी ताईंनी लता दीदीला श्रद्धांजली देत शब्दाला विराम दिला ……या कार्यक्रमाचे संचलन सौं प्राची दामले यांनी केले…… समारोप सौं रसिका मोकासदार यांनी केला..

Copyright ©