यवतमाळ सामाजिक

कौशल्य विकास विभागातर्फे 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

कौशल्य विकास विभागातर्फे 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

यवतमाळ दि. 11 फेब्रुवारी, : : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 13 ते 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान केले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी दिली आहे. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी www.ncs.gov.in या संकेतस्थळावर जाऊन यवतमाळ येथे आयोजित केलेल्या जॉब फेअर दिनाक सिलेक्ट करून जॉब सिकर म्हणून नोंदणी करावी. नंतर जॉब फेअर ॲण्ड इव्हेंट टॅबमधील ऑनलाईन जॉब फेअर ॲट महाराष्ट्र यवतमाळ येथे दिनांक 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2022 ला क्लीक करावे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन नंतर नेक्स्ट करून जॉब फेअर डिटेल्स मध्ये खाली दिलेल्या तक्त्यामधील कंपनीला क्लीक करावे. कंपनीच्या पदासमोर क्लीक करून आपले सबमीट पार्टीसीपेशन करावे.

सुझुकी मोटर्स व मॅक व्हेईकल्स या कंपनीत स्टुडन्ट ट्रेनी, सेल्स एक्सेकेटिव्ह व टाटा ग्रामीण मित्र अशी एकूण 265 पदे भरण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे इयत्ता दहावी, बि.ए. व बारावी पर्यंतची शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. विहित पात्रता धारक उमेदवारांची 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन मुलाखत घेतली जाणार आहे असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.

Copyright ©