यवतमाळ सामाजिक

गणेरी येथे 13 व 14 फेब्रुवारी रोजी व्हॉलिबॉलच्या सामन्यांचे आयोजन

गणेरी येथे 13 व 14 फेब्रुवारी रोजी व्हॉलिबॉलच्या सामन्यांचे आयोजन
———————————————
घाटंजी- तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गणेरी या छोट्याशा गावात मागील अनेक वर्षांपासून व्हॉलिबॉल चे खुले सामने आयोजित करण्यात येत आहेत. विदर्भ, मराठवाडा सह तेलंगणा राज्यामधील अनेक नामवंत खेळाडू , संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. गणेरी येथिल व्हॉलिबॉल चे सामने म्हणजे खेळाडू, प्रेक्षकांसाठी परवनीच असते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी सामन्यांचे आयोजन केले आहे. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मा.श्री. अण्णासाहेब देशमुख पारवेकर ( माजी आमदार), मा. श्री.विनोद चव्हाण ( ठाणेदार पारवा) यांचेसह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार असून दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मा. श्री.जितेंद्र उर्फ बाळूभाऊ मोघे ( सरचिटणीस युवक काँग्रेस म. रा.), मा. श्री.जयप्रकाश काटपेल्लीवार (माजी जि. प. सदस्य) यांचे प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे.
या सामन्यात प्रथम बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय बक्षीस 15,000 रुपये, तृतीय बक्षीस 10,000 रुपये तर चतुर्थ बक्षीस 7,000 रुपये सह अनेक प्रकारचे वैयक्तिक बक्षिसाची रेलचेल राहणार आहे. तरी परिसरातील व्हॉलिबॉल रसिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे नवयुवक क्रिडा मंडळाचे पदाधिकारी तथा समस्त गावकरी मंडळी गणेरी यांनी आवाहन केले आहे.

Copyright ©