यवतमाळ सामाजिक

अंजी (नृ.) येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

अंजी (नृ.) येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
———————————————
जास्तीत जास्त संख्यने सहभागी होण्याचे आवाहन!
———————————————
घाटंजी- जिल्ह्यासह अख्या विदर्भात प्रसिद्ध असलेल्या अन्य राज्यात सुध्दा भक्तगण असलेल्या श्री. नृसिंह महाराज यांची पावन भूमी अंजी (नृसिंह) येथे राजे शिवछत्रपती महोत्सव समिती व एकता बहुउद्देशिय संस्था यांचेवतीने शिवजयंती निमित्त दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०२२ ला विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दि.१८ फेब्रुवारी शुक्रवारला सकाळी १० ते ३ वाजे दरम्यान श्री. नृसिंह देवस्थानात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच सोबत शालेय विद्यार्थ्यांना तब्बल १३५महापुरुषांची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी शिव जयंती दिनी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात येईल. या कार्यक्रमा दरम्यान कोरोनाच्या सर्व नियमाचे तंतोतंत पालन करण्यात येणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आयोजित रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभागी होवुन रक्तदान करावे असे आवाहन अंजी (नृ.) येथिल एकता बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. गोपाल हरी निकम यांनी केले आहे.

Copyright ©