Breaking News यवतमाळ सामाजिक

आरडीतील पैश्याच्या वादातून किन्ही येथे युवकावर प्राणघातक हल्ला.

आरडीतील पैश्याच्या वादातून किन्ही येथे युवकावर प्राणघातक हल्ला.
——————————————–
हल्ल्यातील युवक जागीच ठार
——————————————–
मारेकरी आरोपिना तात्काळ अटक
——————————————–
घाटंजी- तालुक्यातील किन्ही या गावात गुरुवारला आरडी तील जमा पैसे परत मागण्यावरून वाद झाला असता. याचे पर्यावसन मारामारीत झाले असता ते एवढ्यावरच न थांबता चक्क आरडी एजंट हेमंत पवार वय २२ वर्ष, त्याचा भाऊ अमोल पवार आणि नातेवाईक जावई विरेंद्र राठोड यांनी मृतक प्रकाश राठोड ला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने मृतक प्रकाश राठोड च्या मानेवर व छातीवर वार करून गंभीर जखमी केले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक प्रकाश राठोड याने काही दिवसापूर्वी हेमंत पवार कडे आरडी काढल्याचे समजते. पुढे प्रकाशला पैसे भरणे जमले नसल्याने त्यांनी भरलेले पैसे परत मागितले असता यात त्यांचा वाद निर्माण झाला याचे प्रयावसन मारामारीत झाले. यात आरोपींनी धारदार शस्त्राने मानेवर वार केल्याने मृतक प्रकाश राठोड मृत पावले ही घटना घाटंजी पोलिस स्टेशनला कळताच आरोपी यांना ताब्यात घेवून कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. या घटनेने किन्ही ग्राम वासियानी धडक दिली. यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक यांनी वरिष्ठांना सदर घटनेची माहिती देवून आरोपींना पांढरकवडा येथे हलविल्याचे समजते. पुढील तपास पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात घाटंजी पोलीस करीत आहे. झालेल्या प्रकाराने घाटंजी तालुका वासियानी हळहळ व्यक्त केली आहे.

Copyright ©