यवतमाळ सामाजिक

अमोलकचंद महाविद्यालयात सूर्य नमस्कार संकल्प

अमोलकचंद महाविद्यालयात सूर्य नमस्कार संकल्प

विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, छात्र सेना व आय क्यू ए सी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ” आजादी का अमृत महोत्सव ” च्या अनुषंगाने ‘ पंच्याहत्तर करोड सूर्य नमस्कार चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प क्रीडा भारती च्या माध्यमातून करण्यात आला.
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा, क्रीडा भारतीचे डॉ. गढीकर, बाबाजी दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्षीरसागर, शारीरिक शिक्षक अविनाश जोशी , डॉ. साऊळकर उपस्थित होते.
रथसप्तमीला सूर्य कणाकणानी वाढत जातो म्हणूनच सूर्याला वंदन करण्यासाठी सूर्य नमस्कार घेण्याचा संकल्प महाविद्यालयाने घेतला. प्रमुख उपस्थितीत असणा-या प्रशिक्षितांनी योगा व सूर्य नमस्कार याबाबतीत समयोचित विचार मांडले व सूर्य नमस्काराचे प्रशिक्षण दिले.
महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी या संकल्प प्रशिक्षणाकरिता उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. किशोर तायडे यांनी केले. भारतरत्न, विश्व कोकीळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे विषयी डॉ. अनंत सूर्यकार यांनी माहिती सांगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची सुद्धा प्रसंगी
उपस्थिती होती.

Copyright ©