यवतमाळ सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडी घाटंजी वतीने मोफत ऑनलाईन प्रक्रिया नोंदणी अभियान.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने
वंचित बहुजन आघाडी घाटंजी वतीने
मोफत ऑनलाईन प्रक्रिया नोंदणी अभियान.
—————————————
घाटंजी-युगपुरुष, प्रजाहितरक्षक, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जनसामान्यांच्या हितासाठी लोकोपयोगी विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू व कष्टकरी शेतकरी शेतमजुर समस्त वंचित घटकापर्यंत पोहचविण्याचा वंचित बहुजन आघाडी चा प्रयत्न आहे .
सध्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी क्लिस्ट अशी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागते .त्यासाठी जनसामान्यांना आर्थिक झळ सहन करावी लागते. म्हणून आर्थिक दुर्बल घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून देण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
खालील योजनेची ऑनलाईन प्रक्रिया १)ई- श्रम कार्ड , २)covid लसीकरण प्रमाणपत्र, ३)covid मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तीला 50 हजार रुपये मदत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रिया ४) ,covid युनिव्हर्सल पास ५)संजय गांधी निराधार योजना ,६)श्रावण बाळ योजना ,७)तात्काळ कुटुंब असाहाय्य २०,००० रुपये, ८)आयुष्यमान भारत योजना या सर्वऑनलाइन प्रक्रिया मोफत राबविण्यात येत आहे. ई- श्रम व्यवसाय करणाऱ्या असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे .गरजू लाभार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडी ने राबविलेल्या विविध ऑनलाईन मोफत प्रक्रियेचा शुभारंभ दिनांक ०८/०२/२२ ते २८/०२/२२ पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे जनसंपर्क कार्यालय, शिवाजी चौक घाटंजी येथे होईल याचा लाभ घ्यावा असे आवाहन संगपाल कांबळे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी घाटंजी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©