यवतमाळ सामाजिक

अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 6 जण सी एम सी एस महाविद्यालयाचे

अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 6 जण सी एम सी एस महाविद्यालयाचे

स्थानिक हरिकीसन जाजू एज्युकेशन संस्था संचालित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले. अमरावती विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत सर्वात जास्त विद्यार्थी सी एम सी एस महाविद्यालयाच्या बी.बी.ए. विभागातील आहेत. विद्यापीठातर्फे जाहीर होणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता क्रमवारीत महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची नावे झळकली. यशस्वी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये श्रेया सावरकर हिने 2 रे स्थान, हर्षिता अग्रवालने 3 वे स्थान, जान्हवी बाजोरिया आणि कुणाल बुबना याने 5 वे स्थान, आदर्श तिवारी याने 7 वे स्थान आणि अनिल जांगीड याने 8 वे स्थान प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी जाज, संचालक आशीषजी जाजू, खजिनदार सौ. शिल्पा जाजू, सी एम सी एस कॉलेजचे प्राचार्य रितेश चांडक, आइ क्यु ए सी हेड डॉ. अतुल शिंगरवाडे, बी बी ए विभागाचे प्रमुख हुसैन भारमल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Copyright ©