यवतमाळ सामाजिक

झटाळा येथिल युवकांना पोलीस भरती विषयी पारवा ठाणेदाराचे मार्गदर्शन.

झटाळा येथिल युवकांना पोलीस भरती विषयी पारवा ठाणेदाराचे मार्गदर्शन.
———————————————
घाटंजी- तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या झटाळा (दत्तापुर) येथिल युवकांना पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी प्राचारन करून पोलीस भरती बाबत कशी तयारी करायला पाहिजे यावर संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले.
शिक्षण घेता घेता वयाचे भान ठेवून वेळ न दवडता होतकरू तरुणांनी भविष्यात पोलीस खात्यात भरती व्हावे या बाबत मार्गदर्शन करीत पोलीस स्टेशनची कामकाजाची पद्धत समजावून सांगितले. या संवादात पोलिसांचे कार्य त्यातून सामाजिक ध्येय धोरण, जनतेतील समन्वय याबद्दल विस्तृत माहिती देवून उपस्थित युवकांचे मनोबल वाढवीत त्यांना स्फूर्ती सह एक प्रेरणा मिळाली. या संवाद बैठकीत युवकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला होता. त्यामुळे या मार्गदर्शनाने निश्चित युवकांना फायदा होणार आहे. ठाणेदार विनोद चव्हाण यांनी सन्मानपूर्वक वागणूक देवून मार्गदर्शन केल्याने उपस्थित युवक भारावून गेले होते.

Copyright ©