यवतमाळ सामाजिक

घाटंजी पं. समिती शिक्षण विभागाकडून भाषा व गणित पेटी साहित्य प्रशिक्षण संपन्न

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजी पं. समिती शिक्षण विभागाकडून भाषा व गणित पेटी साहित्य प्रशिक्षण संपन्न
———————————————
घाटंजी-विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने
तालुक्यातील शिक्षकांचे
बीआरसी शिक्षण विभाग, पंचायत समिती घाटंजी च्या वतीने दत्त माध्यमिक विद्यालय अंजी (नृ.) व जिजाऊ आश्रम शाळा, खापरी येथे भाषा व गणित पेटी साहित्य प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वाहने यांचे
अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
विस्तार अधिकारी विजया वैद्य, केंद्रप्रमुख सुनिल बोंडे, छाया बन्सोड, अशोक सिंगेवार, शिक्षक गुलाब सिसले, गणेश चव्हाण, रवि नागरीकर, अशोक खरतडे, मनोज गवळी, अर्चना मनोहर, सतिश गणविर, श्रीकांत बोल्लीवार यांनी विषयनिहाय पेटीतील साहित्याद्वारे अध्ययन अध्यापन प्रक्रिया स्पष्ट केली.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख रवि आडे, किशोर मालवीय, अविनाश खरतडे, मोहन ढवळे, भाऊराव मेंगेवार आणि विषयसाधनव्यक्ती मानव लढे, आकाश कवासे यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©