यवतमाळ सामाजिक

डॉक्टरकडून पत्रकाराला अपमानास्पद भाषा व उद्धटपणाची वागणूक

डॉक्टरकडून पत्रकाराला अपमानास्पद भाषा व उद्धटपणाची वागणूक

दिग्रस येथील पत्रकारांचे तहसीलदार राठोड यांना निवेदन

दैनिक हिंदूसम्राटचे प्रतिनिधी अनिल शंकर राठोड यांनी यवतमाळ येथील  हॉस्पिटलमध्ये आपल्या लहान भावाला अपेंडिक्सच्या उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यासोबत डॉ.  चव्हाण यांनी उद्धटपणाची वागणूक तसेच अपमानास्पद भाषा वापरल्यामुळे दिग्रस येथील पत्रकारांनी या घटनेचा निषेध करत संबंधित डॉक्टरवर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन अर्जदार अनिल राठोड यांच्यासमवेत पत्रकारांनी तहसीलदार सुधाकर राठोड यांना आज दि. ०५ फेब्रुवारी रोजी दिले.

मी एक पत्रकार असून माझा भाऊ वसराम शंकर राठोड हा अपेंडिक्सच्या उपचाराकरिता संबंधित दवाखान्यामध्ये भरती असताना, त्याचे ऑपरेशन होऊन तो पाच दिवस भरती होता. डॉ.चव्हाण यांनी मला १० ते १२ हजार रुपये खर्च सांगितला.मी त्यांना १० हजार रुपये घेण्यास सांगितले असता त्यांनी ठीक आहे,असे उत्तर दिले. दि. ०१ फेब्रुवारी रोजी भावाला सुट्टी झाली असताना मी त्यांना बिल देण्याकरिता गेलो असता त्यांनी माझ्या सोबत वाद केला व मला म्हटले की,तुमच्यासारख्या पत्रकाराला मी काही समजत नाही.तुमच्यासारखे पत्रकार कितीही आले तर माझे काही वाकडे होत नाही.तुम्हाला जे काही करायचे आहे,ते करून घ्या. तुम्हाला माझा दवाखाना बंद करायचा असेल तर करून टाका, मी भीत नाही. तुम्ही लवकर १२ हजार रुपये भरा व लवकर निघा, असे संबंधित डॉक्टरनी मला म्हटले व माझा अपमान केला.या घटनेमुळे मी व्यथित झालो असून दोषींवर कठोर कारवाई करून मला न्याय देण्यात यावा,असे अर्जदार अनिल राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सुनिल हिरास, धर्मराज गायकवाड, पी.पी.पप्पूवाले, यशवंत सुर्वे, लुकमान खान, साजिद पतलेवाले, जय राठोड, अजित महिंद्रे, किशोर कांबळे, अभय इंगळे, सदानंद जाधव, गौतम तुपसुंदरे, ऋषिकेश हिरास यांच्यासह दिग्रस तालुका पत्रकार संघटना, ग्रामीण पत्रकार संघटना व प्रेस क्लबचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

Copyright ©