यवतमाळ सामाजिक

पांढरकवडा पोलीसांची जबरदस्त कामगिरी; हायवेवर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश

प्रतिनिधी पांढरकवडा सागर मुडे

पांढरकवडा पोलीसांची जबरदस्त कामगिरी; हायवेवर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश

9 डीसेंबर रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे फिर्यादी लखन जसराम जाटाव रा. मध्यप्रदेष यांनी रिपोर्ट दिला की, 8 डीसेंबर रोजी टी सी आय कंपनीचे कंटेनर क्र. एच आर 47 बी 9219 मध्ये डाॅ. रेड्डीज कंपनीचे औषधी हैद्राबाद येथुन नागपुर करीता घेवुन जात असतांना नॅशनल हायवे 44 वरील महाराष्ट्र सिमेवरील मराठवाकडी येथे एक ट्रक ओव्हरटेक करून कंटेनरसमोर आले व त्यांनी कंटेनर थांबविले त्यानंतर एक पांढऱ्या रंगाची कारमधुन एकुण 03 लोक कंटेनरजवळ येवुन यातील फिर्यादी चालक व त्याचा सहकारी यास पकडुन त्याला रस्त्याचे बाजुला असलेल्या शेतात नेवुन डोळयाला व पायाला पट्टी बांधुन अर्धा तास ठेवले. त्यादरम्यान त्यांचे ईतर सहकाऱ्यांनी कंटेनर क्र. एच आर 47 बी 9219 ही मराठवाकडी पासुन कोंघारा पर्यंत नेवुन कंटेनरमध्ये डाॅ. रेड्डीज कंपनीचे औषधीपैकी 294 बाॅक्स किंमत अंदाजे 25 लाख रूपयाचे मुद्देमाल व चालकाकडुन 6000 रूपये असे एकुण 25 लाख 6 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेले आहे. अषा जबानी रिपोर्ट वरून पोस्टे पांढरकवडा अप.क्र. 1200/2021 कलम 395 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्यता लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक सो यवतमाळ यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक पांढरकवडा जगदिष मंडलवार यांनी तात्काळ पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील दोन पोलीस पथके तयार करून एक पथक हैद्राबाद व दुसरे पथक देवास मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आले. पथकांना मिळालेल्या तांत्रीक पुराव्याच्या आधारे सदर गुन्हयामधील आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले दोन ट्रक व दोन जीप यांचे क्रमांक प्राप्त करून त्या आधारे पुढील तपास करून गुन्हयातील ट्रक क्र. एम एच 19 झेड 5030 व दोन आरोपी यांना अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांचेकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलीस पथक जिल्हा देवास मध्यप्रदेष येथे आरोपीतांचे गावात वेषांतर करून गोपनिय माहिती मिळविली असता संबंधित आरोपी हे डकेती करण्यासाठी पुणे मुंबई परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली वरून पोलीस पथकातील स.पो.नि हेमराज कोळी, स.पो.नि विजय महाले सोबत स्टाफ निलेष निमकर, सचिन काकडे, राजु बेलयवार यांनी तांत्रीक बाबी वरून सदर आरोपी हे पुणे कडे जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या मध्यप्रदेष येथुन मागावर असतांना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातुन समन्वय साधुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीसांचे मदतीने तळेगाव दाभाडे टोलनाका येथे सापळा रचुन गुन्हयातील एक्सयुव्ही कार क्र. एम पी 04 सी एन 9484 व एक्सयुव्ही कार क्र. एम पी 09 डब्ल्यू एच 1032 ताब्यात घेवुन एकुण 09 आरोपी नामे 1) अरविंद अजबसिंह चैहान वय 35 वर्शे रा. ओड ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष, 2) कुंदन राजेंद्रसिंह चैहान वय 33 वर्शे रा. ओड ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष, 3) लोकेष कुंदनसिंह चैहान वय 35 वर्शे रा. सांवेर ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष, 4) कमलसिंग सुगंधनसिंग हाडा वय 61 वर्शे रा. सांवेर ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष, 5) भवानी हनुमान चैहान वय 43 वर्शे रा. ओड ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष,6) संजय केषरसिंह गुदेन वय 35 वर्शे रा. ओड ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष,7) बाबील धरमराज झांझा वय 24 वर्शे रा. धानीघंटी, नेवारी रोड ता. हाटपिपलीया जि. देवास मध्यप्रदेष, 8) अंतिम कल्याण सिसोदिया वय 23 वर्शे रा. ओड ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष, 9) निहालसिंग गुरूड गुदेन वय 34 वर्शे रा. ओड ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष यांना अटक करून तपासा दरम्यान आरोपीतांकडुन सदर गुन्हयातील चोरलेले औशधी विकुन मिळालेल्या रकमेपैकी 4 लाख 37 हजार रूपये आरोपीचे घरी गा्रम सांवेर ता. सोनकच्छ जि. देवास मध्यप्रदेष येथुन हस्तगत करण्यात आले असुन संपुर्ण कार्यवाही दरम्यान एकुण 46 लाख 37 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधिक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधिक्षक, प्रदिप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, जगदिश मंडलवार पोलीस निरीक्षक पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि हेमराज कोळी, स.पो.नि विजय महाले, पो.उप.नि संदिप बारींगे, पो.उप.नि मंगेश भोंगाडे, पोलीस स्टाफ राजु मोहुर्ले, निलेष निमकर, सचिन काकडे, राजु बेलयवार, राजु मुत्यलवार, किषोर आडे, सुरज चिव्हाणे, छंदक मनवर, सिध्दार्थ कांबळे, शषिकांत चांदेकर यांनी सदर कारवाई केली. तरी सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि हेमराज कोळी पोस्टे पांढरकवडा हे करीत आहेत.

Copyright ©