यवतमाळ सामाजिक

लोकशाही बळकट करण्यासाठी पाठ्यपुस्तका त भारतीय संविधानाचा समावेश करावा-प्रफुल्ल राठोड

लोकशाही बळकट करण्यासाठी पाठ्यपुस्तका त भारतीय संविधानाचा समावेश करावा-प्रफुल्ल राठोड
———————————————
किनवट -बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन भारतीय लोकशाही उपलब्धी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय आँनलाईन सेमीनार चे आयोजन दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता करण्यात आले.हे सेमीनार किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या सहकार्यातून घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे होते. त्यांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले की लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय संविधानाचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा व विद्यार्थी जीवनात संविधान व नैतिक मूल्य आत्मसात करण्यास प्रेरक आसेल आसे ते म्हणाले.
सेमीनार चे उद्घाटक प्रमुख पाहुणे किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणरावजी सिडाम हे होते. त्यांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हनाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने निर्माण केलेले संविधान व त्यातुन निर्माण संसदीय लोकशाही त्या पुढील अव्हाने पेलवण्याची क्षमता संविधानात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले. लोकशाही पुढे हजारो आव्हाने आहेत ते पेलवण्याची ताकत भारतीय संविधानात आहे आसे ते म्हनाले.सेमीनार चे मुख्य मार्गदर्शक हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा संशोधक मार्गदर्शक डॉ. एल.व्ही डोंगरे **भारतीय लोकशाही उपलब्धी आणि आव्हाने**या विषयावर विसतृत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. ते बोलतांना म्हनाले
लोकशाहीच्या इतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेऊन भारतीय लोकशाहीच्या जडणघडण यावर प्रकाश टाकला आणि भारतातील लोकशाहीवर परखड भूमिका मांडली जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी भूमिका घेतल्यास भारताची लोकशाही सदृढ आणि प्रगल्भ झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली.या सेमीनार ला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोदवला.या चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा.डॉ. जी.बी.लांब यांनी केले. प्रास्ताविक भाषनात बोलतांना म्हनाले की लोकशाही मुल्य वाढविण्यासाठी व समाजात लोकशाही मूल्य वाढविण्यासाठी व ती रूजवण्यासाठी तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण सेमीनार आहे आसे ते म्हणाले. तसेच संस्था पक अध्यक्ष उत्तमरावजी राठोड साहेब हे संसदीय लोकशाही चे व संविधानाचे गाडे अभ्यासक होते.राठोड साहेब हे उत्कृष्ट संसद पटू होते. त्यांनी भविष्याचा वेध घेऊन अतिदुर्गम भागात शिक्षणाची गंगा घेऊन जानारे भगीरथ आहेत. तोच वसा आणि वारसा विद्यमान संस्था अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे कार्य करत आहेत. म्हनुन त्यांना शिक्षण महर्षी म्हटले पाहिजे तर ते आहेतच.आसे ते म्हणाले.
राष्ट्रीय सेमीनार ला प्रमुख उपस्थिती प्राचार्य डाँ.एस.के.बेंबरेकर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार, डॉ. योगेश सोमवंशी,डॉ. आनंद भालेराव,डॉ. सुरेन्द्र शिंदे,कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक, प्रा.किशन मिराशे,रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.ममता जोनपेल्लीवार,ग्रंथपाल प्रमुख एम.एस.राठोड, डॉ.शुभांगी दिवे ,प्रा.आम्रपाली हाटकर, डॉ.पी.डी.घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव ,प्रर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, प्रा.पुरूषोत्तम यरडलावार, प्रा.डी.टी.चाटे,प्रा.सुशील मुनेश्वर वेबीनार चे संयोजन व नियोजन प्रा.गंगाधर राहुलवाड,प्रा.संतोष पवार, प्रा.डॉ.प्रमेश्वर मुंढे, यांनी केले.प्रा. संदीप राठोड, प्रा डॉ रचना हिपळगावकर,डॉ स्वाती कुरमे, मिलिंद लोकडे, काशिनाथ पिंपरे,सुधीर पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सेमीनार चे सुत्रसंचलन प्रा.गंगाधर राहुल वाड यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार प्रा.संतोष गोपीचंद पवार यांनी मानले.

Copyright ©