यवतमाळ सामाजिक

लाडखेड येथे शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान 922192691

लाडखेड येथे शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

लाडखे- ४ फेब्रुवारी
जिल्हा परिषद यवतमाळ आणि शिक्षणा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळा पं.स. दारव्हा अंतर्गत जि.प.प्रा.म.कें.शाळा लाडखेड येथे आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी ब्रह्मी शाळेचे मुख्याध्यापक कुंभारे सर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख ओ डी राठोड, मु.अ.किशोर उईके मार्गदर्शक सिद्धांत तूपसुंदरे होते.
प्रस्तावना केंद्रप्रमुख ओ.डी.राठोड यांनी केली.
प्रेरणा उपक्रम अंमल बजावणी या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या मध्ये शिक्षणा फाऊंडेशन दारव्हाचे तालुका प्रतिनिधी सिध्दांत तुपसुंदरे यांनी सर्व सहभागींना उपक्रमाची संरचना, सराव साहीत्याची वैशिष्ट्य, वापर आणि वितरण, त्याचबरोबर सराव साहित्याची उपयोगिता याबाबत सविस्तर माहीती देण्यात आली. युनायटेड वे हैदराबाद या संस्थेमार्फत
प्रेरणा उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता ४ थी ते ८ वी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान आणि मराठी या विषयांच्या सराव पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास ७८ हजार विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग असणार आहे.
यावेळी चानी केंद्राचे १६ व लाडखेड केंद्राचे ६ शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता नासरे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजू दुधे यांनी केले.

Copyright ©