यवतमाळ सामाजिक

7 फेब्रुवारी सोमवार रोजी सावळी सदोबा येथे रोजगार मेळावा.

सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

7 फेब्रुवारी सोमवार रोजी सावळी सदोबा येथे रोजगार मेळावा.

सावळी सदोबा शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था कृष्णनगर ता. आर्णी यांच्यावतीने सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता साई मंगल कार्यालय सावळी सदोबा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावळी सदोबा व परिसरातील सुशिक्षित बेकार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने सावळी सदोबा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ,
या रोजगार मेळाव्यात प्रथम फाउंडेशनच्या वतीने नोकरी व नोकरीसाठी घ्यावयास लागणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल सर्व सुशिक्षित मुला-मुलींना संपूर्णपणे मार्गदर्शन होणार आहे.
8 पास ते पुढील शिक्षण घेतलेल्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा शहीद ज्ञानेश्वर आडे संस्थेचा प्रयत्न असल्याचे वीरपत्नी श्रीमती कुंतीताई ज्ञानेश्वर आडे, माजी सरपंच केळझरा ,नुनेश्वर आडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी, मुबारक तंवर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यवतमाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.
रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा मुला मुलींना एक महिन्याचे प्रशिक्षण कुठलीही फी न घेता देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या मुला मुलींची राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील मोफत असेल असे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रमोद कांबळे सर यांनी सांगितले आहे .
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रमोद कांबळे सर मेंटर लीडर मल्टी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर राळेगाव हे राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळी सदोबा सर्कलचे लोकनेते श्री बाळासाहेब शिंदे असतील तर या रोजगार मेळाव्याचे उदघाटन पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विनोद चव्हाण साहेब हे राहतील असे जाहीर पत्रकातून प्रसिध्द करण्यात आले आहे.
या मेळाव्याला नोंदणीकरिता वैभव कांबळे मोबाईल नंबर 9112768812 यांच्याशी संपर्क साधावा.
नोंदणी संपूर्णता मोफत राहील याचीही सर्वांनी नोंद घ्यावी असेही आयोजकांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून जाहीर केले आहे.

Copyright ©