यवतमाळ सामाजिक

तालुका प्रशासनाची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

तालुका प्रशासनाची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्याव

दिग्रस तालुक्यात येण्यास अधिकाऱ्यांना कोणी अडविले?

तहसील प्रश्सासन, पोलीस प्रशासन , पंचायत समिती , भूमी अभिलेख ,दुय्यम निबंधक, वन विभाग, नगर परिषद ,शिक्षण विभाग  या सर्वच ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांच्याच खांद्यावर धुरा असून.प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर धुरा देण्या मागे नेमके कारण काय? सर्व विभागावर प्रभारी अधिकारीच का नेमण्यात आले ,यवतमाळ  जिल्ह्यातच नसून संपूर्ण महाराष्ट्रात असा तालुका शोधून सापडणार नाही, जिथे संपूर्ण तालुक्यातील प्रशासनाचा कारभार प्रभारी अधिकारीच पाहत आहेत , अशी तिखट प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकांतून उमटताना दिसून येत आहे.

ग्रामीण भागातून शेकडो नागरिक दररोज तालुक्याच्या ठिकाणी आपल्या शासकीय कामासाठी येतात. सोबतच शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या लोकांना पण विविध कामासाठी शासकीय दरबारी जावे लागते. मात्र शहरात असणाऱ्या जवळपास सर्वच तालुका प्रशासनाची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने कायमस्वरूपी अधिकारी संबंधित विभागाला मिळेल का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत .

तालुका प्रशासनाच्या काही विभागात तर अवधी उलटूनही अधिकारी वर्ग निव्वळ प्रभारी म्हणून खुर्चीवर विराजमान असल्याचे दिसत आहे. दरवर्षी अनेक तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात. मग दिग्रस तालुक्यासाठी त्याच त्या व्यक्तीवर प्रभार देण्याचे कारण काय? असा सवाल नागरिक करताना दिसत आहे. दिग्रस तालुका प्रशासनासाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Copyright ©