यवतमाळ

मांडवा येथे स्मृती प्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन

मांडवा येथे स्मृती प्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन

ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज (पाटील) यांचे राहणार कीर्तन

दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. दिगांबर दत्तात्रय गादेवार व शिवसेना उपजिल्हा प्रमुख , माजी सरपंच ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक स्व. अरविंद प्रल्हाद गादेवार यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज (पाटील) व मृदंग सम्राट ह.भ.प.चंदू महाराज पांचाळ यांचे कीर्तन उद्या शनिवार दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत महादेव मंदीर परिसरातील अशोकराव गादेवार यांच्या शेतात आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास परिसरातील वारकरी भजनी मंडळी उपस्थितीत राहणार आहे तरी या कार्यक्रमाचा परिसरातील समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गादेवार परिवार व गावकऱ्यांनी केले आहे.

Copyright ©