यवतमाळ सामाजिक

युवा पत्रकार पवनभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन..

युवा पत्रकार पवनभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन..
———————————————
यवतमाळ- अलीकडे वाढदिवस म्हटले की, मौज, मजा मित्रांची पार्टी अश्यात पैशाची उधळण करण्याची फॅशन झाली आहे. मात्र याला तिलांजली देत जगात कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीस आली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण सुध्दा जिकरीचे झाले आहे. त्यातल्या त्यात इतरही आजाराने डोके वर काढले असल्याने त्या आजारावर शहराच्या ठिकाणी जावून उपचार घेणे जिकरीचे झाले आहे. या बाबीची गंभीरतेने विचार करून जोडमोहा येथिल युवा पत्रकार पवन धोत्रे यांचा दिनांक ४ फेब्रुवारीच्या वाढदिवसानिमित्त अन्य बाबीवर पैश्याची उधळण न करता त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चैत्यन्यम इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स इन हेल्थ केअर, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिर व मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी चे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकारी क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे पवन भाऊ धोत्रे सदैव सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायशी लढा देतात आपल्या कार्यकुशल शैलीतून ते पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची कार्यकुशलता जिल्हाभर परिचित आहे. अश्यातच त्यांचा दिनाक ४ फेब्रुवारी ला वाढदिवस हया वाढदिवसावर पैश्याची उधळण करण्याऐवजी काहीतरी करावे असे महान विचार मनाशी बाळगून आपल्या मित्र मंडळीना विश्वासात घेऊन व चैतन्यम इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स इन हेल्थ केअर, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ फेब्रुवारी२०२२ ला सकाळी १० ते ५ वाजे पर्यंत जोडमोहा येथिल स्थानिक विश्राम गृहात मोफत भव्य आरोग्य शिबिर व मोफत ई-श्रम कार्ड नोंदणीचे आयोजन करीत एक मोठी प्रेरणा यातून दिली आहे. या आरोग्य शिबिरात सुप्रसिध्द तज्ञ डॉक्टर राहणार असून यात माता व बालक आरोग्य तपासणी, लहान मुलांची हृदयरोग तपासणी, डोळ्याची तपासणी व मोतीबिंदू निदान केल्या जाणार आहेत. सोबतच शासनाच्या विविध योजने उपयोगी मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी करून दिल्या जाणार आहे. या कार्ड नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक खाते नंबर आवश्यक आहे. या मोफत भव्य आरोग्य शिबिर व ई-श्रम कार्ड नोंदणी चा लाभ जोडमोहा परिसरातील जनतेनी घ्यावा असे आवाहन आयोजक तथा पवनभाऊ धोत्रे मित्र परिवाराचे अभिलाष नित, प्रविण ढाकुलकर, कुणाल पंचबुद्धे, निखिल बोंद्रे, निलेश लडके,बंडू भाऊ वाघाडे, मंगेश मेश्राम, निलेश राठोड मनू राठोड,बॉबी राठोड, निकेश नेवारे, राजेश चव्हाण रोहन शेंद्रे,मंथन लांडगे यांनी केले आहे. सोबतच कोरोनाचे सर्वत्र निर्बंध बाळगल्या जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Copyright ©