यवतमाळ राजकीय

शिवसेना भोसा विभागातर्फे मोफत भव्य आरोग्य शिबिर संपन्न

शिवसेना भोसा विभागातर्फे मोफत भव्य आरोग्य शिबिर संपन्न.
———————————————
यवतमाळ- कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून यातही ईतर आजाराने डोके वर काढले आहे. त्यामध्ये अनेक आजारांवर खर्च करण्याची परिस्थिती नाही ही जाणिव ठेवून आपल्या वॉर्डांत सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी हा उदांत्त हेतू पुढे ठेवून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग भाऊ पिंगळे, राजेन्द्र भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात शिवसेना भोसा विभाग व शिवसेनेच्या कार्यकर्त्या सौ. नंदाताई भिवगडे यांच्या पुढाकारात आज दिनांक २ फेब्रुवारी ला स्थानिक के.जी.एन. रजवाडा लॉन मध्ये मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करून यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नेत्र तपासणी व प्रथोमपचार आरोग्य तपासणी सुप्रसिध्द तज्ञ डॉक्टर चमू मार्फत करण्यात आली. या वेळेस परिसरातील रुग्णांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांची मोफत तपासणी करून त्या त्या आजारावर मोफत औषधी देण्यात आली. तर नेत्र आजारावरील गरजावंत रुग्णांना नाममात्र शुल्कात चष्मे वाटप करण्यात आले. शिबिराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या भव्य आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख परागभाऊ पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून रजवाडा लॉन व के. जी. एन.प्रतिष्ठानचे संचालक रहेमान भाई, जयराम पवार आणि शिबिराचे आयोजिका नंदाताई मनोज भिवगडे, डॉ. अनिल चव्हाण, डॉ. तेजस ठोंबरे, डॉ. प्रतिक चव्हाण, डॉ. विठ्ठल जुमडे हे मंचकावर विराजमान होते. यावेळी परागभाऊ पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याच्या काळात आरोग्य ही मोठी समस्या जाणून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. या पुढेही हे कार्य शिवसेना करीत राहील असे नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु चव्हाण यांनी केले तर भव्य आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राहुल गंभीरे यांच्या सुष्म नियोजनानुसार नाबिभाई, मनोजभाऊ भिवगडे, मुन्ना भिवगडे, किशोर भिवगडे, विशाल भिवगडे यांनी अथक परिश्रम घेतले. अखेर सर्वसामान्य रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा दिल्यामुळे व उपस्थित मान्यवरांचे आभार सौ. नंदाताई मनोज भिवगडे यांनी मानले.

Copyright ©