यवतमाळ सामाजिक

गणित विषयाच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणानंतर करिअरच्या संधी विषयावर” राज्य स्तरीय सेमीनार मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा-प्रा.डॉ. जी.बी.लांब

गणित विषयाच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणानंतर करिअरच्या संधी विषयावर” राज्य स्तरीय सेमीनार मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा-प्रा.डॉ. जी.बी.लांब

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणित विभागाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन गणित विषयाच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणानंतर करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय राज्य स्तरीय आँनलाईन सेमीनार चे आयोजन दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ गुरूवारी सकाळी ११:३० वाजता करण्यात येनार आहे.हे सेमीनार किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून व
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या सहकार्यातून घेण्यात येनार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे राहणार आहेत.
सेमीनार चे उद्घाटक प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे राहनार आहेत.सेमीनार चे मुख्य मार्गदर्शक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागाचे डॉ. सुभाष केंद्रे व बीज भाषक मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणित संकुल चे डायरेक्टर प्रोफेसर डी.डी.पवार , हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. सय्यद जलील व नारायणराव वाघमारे महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. सुधाकर गाडे गणित विषयाची पदवी व पदवीत्तर विषयाच्या करिअर च्या संधी या विषयावर मौलिक मार्गदर्शन करनार आहेत.या सेमीनार ला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोदवावा.याचा निश्चितच भविष्यात फायदा होईल आसे गणित विभाग प्रमुख प्रा डॉ. जी.बी.लांब यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.राज्यस्तरीय सेमीनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डाँ.एस.के.बेंबरेकर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार, डॉ. योगेश सोमवंशी,डॉ. आनंद भालेराव,डॉ. सुरेन्द्र शिंदे,कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक, सेवानिवृत्त गणित विभाग प्रमुख उमाकांत इंगोले, प्रा.किशन मिराशे,रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.ममता जोनपेल्लीवार,ग्रंथपाल एम.एस.राठोड, डॉ.शुभांगी दिवे ,प्रा.आम्रपाली हाटकर, डॉ.पी.डी.घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव ,प्रर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, प्रा.पुरूषोत्तम यरडलावार, प्रा.डी.टी.चाटे,प्रा.सुशील मुनेश्वर
डॉ रचना हिपळगावकर,डॉ स्वाती कुरमे, मिलिंद लोकडे, काशिनाथ पिंपरे,सुधीर पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेत आहेत.

Copyright ©