यवतमाळ सामाजिक

नेताजी सुभाषचंद्र बोस व अजाद हिंद सेना राष्ट्रीय आँनलाइन चर्चा सत्र संपन्न 

नेताजी सुभाषचंद्र बोस व अजाद हिंद सेना राष्ट्रीय आँनलाइन चर्चा सत्र संपन्न 
———————————————
किनवट-बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन नेताजी सुभाषचंद्र बोस व आजाद हिंद सेना या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय आँनलाईन वेबीनार चे आयोजन दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ बुधवारी दुपारी १२:०० वाजता संपन्न झाले.हे वेबीनार किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे होते. ते आपल्या भाषनात बोलतांना म्हनाले की क्रांतिकारकांचा इतिहास पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविल्या जात नाही. जर त्यांच्या जीवन कार्यावर स्वतंत्र पेपर चालवले तर नक्कीच विद्यार्थामध्ये राष्ट्र भक्तीभावना वाढेल.आसे ते म्हनाले.कार्यक्रमाचे उद्घाटक किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायण रावजी सिडाम हे होते.त्यांनी बिरसा मुंडा ते थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस क्रांतिकारकांच्या विवारावर प्रकाश टाकला.इंग्रजांना वटनीवर आनायचे आसेल तर हातामध्ये शस्त्र घ्यावे लागेल.शस्त्राला शस्त्रानेच उत्तर द्यावे लागते. हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शास्त्र होते.नेताजी ने आजाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य केले असे ते आपल्या भाषनात म्हनाले. वेबीनार चे मुख्य मार्गदर्शनक इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड चे इतिहास विभाग प्रमुख डॉ. जी.एस.पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व आजाद हिद सेना या विषयावर मौलिक मार्गदर्शन करतांना आपल्या भाषनात म्हनाले की नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रखर राष्ट्रवादी होते.ते कट्टर प्रजासत्ताकवादी होते.पुढे बोलतांना म्हनाले की नेताजी सुभाषचंद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता.त्यांनी शिवचरित्र वाचन करून त्याचा दैनंदिन जीवनात वापर केला आहे. शिवरायांच्या गनमी काव्याचा स्वातंत्र्य आंदोलनात पूरेपूर फायदा उठवला. व आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.आसे ते म्हणाले.या वेबीनार ला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
राज्यस्तरीय वेबीनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डाँ.एस.के.बेंबरेकर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील,डॉ जी.बी.लांब,प्रा.किशन मिराशे,डॉ. सुरेन्द्र शिंदे, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने,प्रा.पुरूषोत्तम यरडलावार , डॉ योगेश सोमवंशी, प्रा.अजय पाटील, प्रा.ममता जोनपेल्लीवार,ग्रंथपाल एम.एस.राठोड, डॉ. पी.डी.घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव ,डॉ. स्वाती कुरमे,
डॉ. रचना हिपळगावकर, मिलिंद लोकडे, काशिनाथ पिंपरे,सुधीर पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेत असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©