यवतमाळ सामाजिक

स्वस्तात सोने देतो म्हणत केलेल्या फसवणुकीतील जप्तीतील रक्कम परत.

स्वस्तात सोने देतो म्हणत केलेल्या फसवणुकीतील जप्तीतील रक्कम परत.
———————————————
घाटंजी -पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत सन २०२० मध्ये जमिनीत सोने सापडले ते स्वस्तात देतो म्हणत सात आरोपींनी फिर्यादी बाबामिया मेहबूब कुरेशी रा. उमरी (रोड) ता. पांढरकवडा यांना स्वस्तात सोने देतो म्हणत ७० हजार रुपये घेवून फसवणूक केली होती. यातील तत्कालीन तपास अधिकारी यांनी आरोपींना अटक करून त्यांचेकडील रोख रक्कम जप्त केली होती ती रक्कम दिनांक १ फेब्रुवारी २०२२ ला पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील सो. यांच्या हस्ते धनादेशाद्वारे फिर्यादीस प्रदान करण्यात आली.
बहुचर्चित सन २०२० मधील घटना जमिनीतून सोने निघाले ते स्वस्तात देतो म्हणत पांढरकवडा तालुक्यातील उमरी (रोड) येथिल बाबामिया मेहबूब कुरेशी यांची सत्तर हजार रुपये घेवून फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे माहीत होताच त्यांनी पारवा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पारवा पोलिसांनी तपास चक्र चालवून अपराध क्रमांक २१७/२०२० भादवी ४२०,१७०,३४ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करून फसवणूकीतील रक्कम जप्त केली होती. याबाबतचे प्रकरण मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी घाटंजी यांचे न्यायालयात प्रलंबित आहे. तक्रारदारास रू ७० हजार रक्कमेची अंतरिम कस्टडी देणेबाबत पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण हेड मोहरर स. फौ. सुनिल कुडमते यांचे कडून करण्यात आले होते. प्रकरणातील जप्तीतील रक्कम ही तक्रारदार बाबामिया मेहबूब कुरेशी यांची असलेले पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या निदर्शनास आले. ती रक्कम पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रदीप पाटील सो. यांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आल्याने बाबामिया कुरेशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतेच मानुसधरी येथिल शेतकऱ्यांची सुध्दा लुटीतील रक्कम पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Copyright ©