यवतमाळ सामाजिक

बळीराम पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी यांचा स्मृती दिन राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून साजरा

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

बळीराम पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी यांचा स्मृती दिन राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून साजरा
———————————————
किनवट -बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ३० जानेवारी २०२२ रोजी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांचा स्मृती दिन राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी म.गांधी यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकला.महात्मा गांधी यांनी सत्य ,अहिंसा व न्याय या तत्वामुळे देशाला स्वातंत्र्य मिळतेच या विचारावर ठाम होते. देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आहे. याची प्रचिती संबंध देशाला कोविड- १९ च्या काळात आली आहे. शहराकडील लोंढा हा खेड्याकडे तीव्र गतीने येऊ लागला आहे. अशा महान विभूतिचा आज ३० जानेवारी रोजी हत्या झाली.परंतु त्याचे विचार जीवंत आहेत. त्यांच्या विचार व कार्याला शतशः कोटी कोटी नमन.आभिवादनाच्या कार्यक्रमानंतर ३ मिनिट हुतात्म्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रसंगी सर्वप्रथम उपप्राचार्य डॉ जी.एस.वानखेडे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.उपस्थित संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार,पर्यवेक्षक प्रा .अनिल पाटील, डाँ. पंजाब शेरे , कार्यक्रमाधिकारी कनिष्ट विभाग प्रा. पुरुषोत्तम येरडलावार महिला कार्यक्रमाधिकारी , डाँ लता पेंडलवाड , प्रा योगेश सोमवंशी, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

Copyright ©