यवतमाळ सामाजिक

महानुभाव हेच मराठी साहित्याचे खरे निर्माते डॉ प्रवीण बनसोड यांचे प्रतिपादन

महानुभाव हेच मराठी साहित्याचे खरे निर्माते डॉ प्रवीण बनसोड यांचे प्रतिपादन

यवतमाळ
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लोकभाषा
मराठीला धर्मभाषा आणि ज्ञानभाषेचा दर्जा देऊन
मराठी साहित्याची पायाभरणी केली, त्यामुळे
महानुभाव हेच मराठी साहित्याचे खरे निर्माते
आहेत, असे प्रतिपादन नेहरू महाविद्यालय,
नेरपरसोपत चे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण बनसोड यांनी केले. ते
जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ द्वारा
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत
होतो.

महानुभाव पंथाचे मराठी भाषेला योगदान ”
या विषयावर आयोजित व्याख्यानसूत्रात
पुढे बोलतांना, डॉ. प्रवीण बनसोड यांनी, मराठी
भाषेत गद्य, पद्य, कोश सांकेतिक लिपी,
व्याकरण, यांसारखे साहित्याचे विविधांगी
प्रकार महानुभावीयांनी समर्थपणे हाताळले.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रेरणेने म्हाइंभट व इतर साहित्यकारांनी
लोकभाशेत साहित्याची निर्मिती करून
नवी क्रांती केली, हे भाषिक स्वातंत्र्याचे
पहिले आंदोलन होय, असे सांगितले.

लोकभाषेत
सामान्य बहुजनांना समजेल अश्या
तत्त्वज्ञान व साहित्याची निर्मिती
करण्याची प्रेरणा देणारे चक्रधर स्वामी
हे पहिले लोकभाषाप्रेरक तर आचार्य
नागदेवाचार्य हे
भाषासँवर्धक
ठरतात.
त्यामुळेच शेकडो पोथ्या व
जागतिक दर्जाचे ग्रंथ महानुभावीयांनी
निर्माण केले, असे डॉ. प्रवीण बनसोड
यांनी यावेळी म्हटले. व्याख्यानमालेत
जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी श्री. देवते,
मराठी भाषा अधिकारी श्री.
एस. के. डोईफोडे
जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती सदस्य
डॉ अशोक राणा प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©