यवतमाळ सामाजिक

मनरेगा अंतर्गत सुकळी येथील पूर संरक्षक भिंत बांधली आहे निकृष्ठ व नागमोडी.

 प्रतिनिधी सय्यद अक्रम

मनरेगा अंतर्गत सुकळी येथील पूर संरक्षक भिंत बांधली आहे निकृष्ठ व नागमोडी.

आर्णी तालुक्यात मौजा सुकळी येथे मनरेगा अंतर्गत पुरसंरक्षक भिंत बांधण्यात येत आहे.ही भिंत बांधताना मजूरा ऐवजी मशीनरीचा वापर करून मोठं मोठे दगड वापरून ही भिंत सरळ न बांधता नागमोडी बांधून बोगस काम करून शासनाचा लाखो रुपयाचा निधी लाटण्याचा डाव कथित ठेकेदार व कर्मचारी यांनी आखला आहे काम सुरू असताना यंत्रणा कामावर येऊन सुद्धा पाहत नाही त्या मुळेच आर्णी तालुक्यात पूर संरक्षक भिंती चा भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे तालुक्याचा कुशल अकुशल चा रेशो पार बिघडला असताना सुद्धा जिल्हा परिषद उप विभाग आर्णी पूर संरक्षक भिंती ला निधी देतातच कसे व का हा प्रश्न अनुत्तरित आहे.आज ही आर्णी तालुक्यात 167 पूर संरक्षक भिंती चे बांधकाम सुरू आहे ज्या भिंती शासन निकषात बसत नाही त्या भिंतीवर लेबर पेमेंट करणे कितपत योग्य आहे?

Copyright ©