यवतमाळ सामाजिक

गोर सेनेच्या घाटंजी तालुका अध्यक्ष पदी गणेश राठोड यांची निवड

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

गोर सेनेच्या घाटंजी तालुका अध्यक्ष पदी गणेश राठोड यांची निवड
———————————————
घाटंजी- दिनांक ३१ जानेवारी रोज सोमवारला गोरसेनेची बैठक घेण्यात आली या बैठकीत युवक वर्गातून अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते गणेश राठोड यांचे नाव पुढे करण्यात आले. यानुसार गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश भाऊ चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संपत भाऊ चव्हाण यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष किशोर पालत्या यांच्या नेतृत्वात गणेश राठोड यांची घाटंजी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देवून निवड करण्यात आली.
गोर सेनेचे ध्येय धोरण आणि दुर्बल घटकासाठी काम करण्याचे तसेच शिक्षण, आरोग्य, कार्यालयीन अडचणीत गोर गरीबांना मदत करणार असल्याचे गणेश राठोड यांनी सांगितले असून समाजातील अपेक्षित वर्गातील लोकांना न्याय, हक्क, आपला अधिकार आणि सन्मान या गोष्टीवर गोर सेना लढा उभारण्यासाठी घाटंजी तालुक्यात गोर सेना सक्रिय सहभाग घेणार असल्याचे आपल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे. या निवडीत गोर सेनेच्या तालुका सचिव म्हणून यशवंत राठोड, संघटक अरविंद जाधव, सहसचिव पवन आडे, कोषाध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष विशाल राठोड, प्रसिध्दी प्रमुख अजय राठोड, सल्लागार प्रफुल पवार तर सदस्य म्हणून विनोद राठोड, नरेश चव्हाण, किरण राठोड, सुनिल जाधव विकास राठोड, कुणाल चव्हाण, जीवन राठोड, नरेंद्र राठोड, सुधाकर आडे, संजय चव्हाण उत्तम जाधव, बाळू चव्हाण, उल्हास राठोड, रामदास राठोड, अवि राठोड, सागर राठोड याची निवड करण्यात आली आहे. या निवडी वेळी समाजातील बहुसंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Copyright ©