यवतमाळ सामाजिक

पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार… विनोद चव्हाण!

पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार… विनोद चव्हाण!

———————————————
पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात विविध क्षेत्रात पादाक्रांत करून ठाणेदार विनोद चव्हाण यांनी अवघ्या पाच महिन्यात आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यापैकी एक म्हणजे पारवा ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील असणारे विनोद चव्हाण पाच महिन्यापूर्वी पारवा पोलीस स्टेशनला रुजू झाले. एक शिस्तप्रिय निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ ठाणेदार म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख झाली.
पारवा पोलीस स्टेशन हे आदिवासी बहुल असून आंध्रप्रदेशच्या सीमेलगत असून डोंगराळ भागात वसले आहे. या पोलीस स्टेशनला कार्य करतांना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती असताना “या परिसरासाठी मी काय करणार? हे मी केवळ तोंडी न सांगता माझे कामच बोलेल”असे उदगार त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले होते. पारवा पोलीस स्टेशनचे पदभार स्वीकारल्यापासून आजवर सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविले आहे. ज्यांच्यावर अन्याय झाले आहे अश्याना न्याय देवून त्यातील दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस उत्तम कार्य बजावित आहे. त्यांनी रुजू होताच अवैध धंद्यांवर छापे टाकून त्यावर अंकुश मिळविले आहेत. त्यांनी पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गावोगावी शांतता कमिटीची बैठके घेवून सर्वसामान्यांपासून तर महिला वर्गासोबत हितगूज साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांचे निरसन केले आहे. महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे असे ते मानतात. हे केवळ ते बोलत नाही तर कृतीतून दाखवून देत आहे. सेवा बजावण्यासाठी तत्पर असताना पोलीस ठाणे आणि सावळी (सदोबा) दुरक्षेत्र चौकीत आलेल्या नागरिकांना पोलिसांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी असे त्यांनी आवर्जून सांगतात. रुजू झाल्यापासून त्यांनी आजवर केवळ पाच महिन्यात केळापूर गाव, जलांद्री अश्या गावात आज पर्यंत एकही ठाणेदार पोहचले नाही अश्या गावांसह प्रत्येक गावात पोहचून तेथील सर्वसामान्य नागरिकांची भेट घेवून त्यांच्या तक्रारीचे त्यांच्या स्तरावरील बाबीचे निरसन करून ईतर बाबीच्या समस्या सोडविण्यासाठी संबधित विभागास कळविले आहे. गावोगावी जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर जाहीर करून नागरिकांच्या त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तो उपलब्ध करून देणारे ते पहिले ठाणेदार आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावेत त्यासाठी येणाऱ्या अडचणी ते स्वतः सोडवितात याबाबत पोलीस पाटील व तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्षाची सभा घेवून सर्वांना आवाहन सुध्दा केले होते. एवढेच नव्हे तर दोन वर्षांपासून आदिवासी समाजातील माणूसधरी येथिल शेतकरी लक्ष्मण मोतीराम पेंदोर यांचे लुटीतील रक्कमेची न्यायालयाचे परतीचे आदेश असताना सुध्दा पारवा पोलीस स्टेशनच्या खात्यात अडकून पडले होते. मात्र कर्त्यव्यदक्ष असलेले हेच ठाणेदार यांनी मागील व्यवहारावर नजर फिरवून त्या शेतकऱ्याची रक्कम या प्रजासत्ताक दिनी त्यास सुपूर्द करून त्याला मोठा दिलासा दिला. शिवाय आजादी का अमृत महोत्सव २०२२ साजरा करीत असताना आर्णी तालुक्यातील १० ते १२ आदिवासी कुटुंब वास्तव्यास असलेल्या जलांद्री या गावास भेट दिली. येथिल गावातील राहणीमानाबद्दल माहिती घेतली मात्र या गावास अजूनही दळण वळणास रस्ता नसल्याचे लक्षात येताच त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून यास सर्वांनी मिळून येथील परिस्थिती बदलायला हवी असे ही आवाहन केले आहे.
त्यांच्या कार्यपद्धतीतून त्यांनी सामान्याप्रती असणारी आत्मीयता दाखवून दिली आहे. त्यांचे कार्य आणि जनतेतील समाधान त्यामुळे त्यांना गावातील कोणत्याही कार्यक्रमात बोलावून त्यांचा सन्मान करून सत्कार करण्यात येत आहे. या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला सलाम…
———————————————
लेखक-राजु चव्हाण
मो. नं.९४२०३०९०६४

Copyright ©