यवतमाळ सामाजिक

चांदापूर ग्राम पंचायत तर्फे निःशुल्क भव्य आरोग्य शिबिर संपन्न 

चांदापूर ग्राम पंचायत तर्फे निःशुल्क भव्य आरोग्य शिबिर संपन्न 
———————————————
यवतमाळ- कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील जनता शहरी भागात जाण्यास दुजावत असल्याने अनेक आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा गावातच मिळावी हा दृष्टीकोन पुढे ठेवून चांदापूर ग्रामपंचायतीने निःशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करून यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य तपासणी व प्रथोमपचार यवतमाळ शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स यांचे मार्फत आयोजित होते. या भव्य शिबिराचे उदघाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश धुरत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वसंत जाधव, पोलीस पाटील आकाश अंभोरे, प्रेमदास पकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रथम नागरिक सरपंचा सरलाताई जाधव व उपसरपंच वासुदेव जाधव तथा ग्राम पंचायतीचे सर्वत्र सदस्य हे लाभले. या शिबिरात एक्सरे, ई सी. जी. बहिरेपणा, व श्रवण यंत्र, हाडातील कॅल्शियम, ब्लड व शुगर टेस्ट यासह सर्व औषधी वाटप मोफत करण्यात आले. या भव्य आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली. याशिवाय या शिबिरात युवक युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. अखेर या शिबिरात सहभागी तज्ञ डॉक्टर व उपस्थित रुग्णांचे तथा उपस्थित मान्यवरांचे आभार शिबीराचे आयोजक कविराज हाऊस कंपनीचे संचालक स्वप्नील राठोड यांनी मानले.

Copyright ©