यवतमाळ सामाजिक

सुसंस्कार विद्या मंदिर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीनां पुण्यतिथी निमित्य अभिवादन

सुसंस्कार विद्या मंदिर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीनां पुण्यतिथी निमित्य अभिवादन

यवतमाळ: सुसंस्कार विद्या मंदिर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 76 वी पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणुन साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम उपस्थित होत्या.
हुतात्मा दिन म्हणून साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करून करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन स्वरूपात आयोजित हा कार्यक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागात घेण्यात आला. या कार्यक्रमात गांधीजी या महान व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर विद्यार्थ्यांनी भाषणे, काव्यवाचन व विविध कलागुण तसेच घर – परिसर स्वच्छता करून त्याची ध्वनीचित्राफित तयार करून सादर केल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत व सामूहिक नाटिका सादर केल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम यांनी आपल्या मार्गदर्शनात गांधीजींच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कसा अंगीकार करावा हे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाद्वारे पटवून दिले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणीबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©