Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 364 पॉझिटिव्ह 396 कोरोनामुक्त ; एक मृत्यू  जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1699 बेड उपलब्ध

गेल्या 24 तासात 364 पॉझिटिव्ह 396 कोरोनामुक्त ; एक मृत्यू जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1699 बेड उपलब्ध

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1962

यवतमाळ दि. 30 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 364 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 396 जण कोरोनामुक्त झाले असून एका कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1918 व बाहेर जिल्ह्यात 44 अशी एकूण 1962 झाली असून त्यातील 52 रूग्ण रूग्णालयात तर 1910 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1287 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 364 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 923 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77518 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 73764 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1792 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्या रूग्णांत वणी येथील 39 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 364 रूग्णांमध्ये 135 महिला व 229 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात नऊ, बाभुळगाव 27, दारव्हा 45, दिग्रस 32, घाटंजी 11, कळंब 29, मारेगाव दोन, नेर 11, पांढरकवडा 22, पुसद पाच, राळेगाव आठ, उमरखेड 77, वणी चार, यवतमाळ 74, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील सात रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 18 हजार 358 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 40 हजार 508 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.47 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 28.28 आहे तर मृत्यूदर 2.31 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1699 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 67 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1699 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 61 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 726 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 6 बेड उपयोगात असून 851 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Copyright ©