Breaking News यवतमाळ सामाजिक

मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईचाच केला विनयभंग

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईचाच केला विनयभंग
———————————————
घाटंजी- तालुक्यातील पंगडी येथे मन हेलावून टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून दत्तात्रय यादव गावंडे वय ४२ वर्ष हा आपल्या म्हातारी आईला बाम लावून हात दाबून देतो म्हणत जन्मदात्या आईचाच विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
पंगडी येथिल दत्तात्रय यादव गावंडे याला दारूचे व्यसन असल्याने दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी आपल्या एका मुलीला व मुलाला घेवुन माहेरी निघून गेली. त्यानंतर दत्तात्रय व त्याची म्हातारी आई दोघेच घरात राहायचे. अश्यातच तो शुक्रवारला दिवसभर दारू पिवून असल्याने रात्री एक वाजेदरम्यान मद्यधुंद अवस्थेत गेला. आणि झोपी गेलेल्या आईला जागे करून आई तुझा हात दुखत आहे मी बांम लावून हात दाबून देतो म्हणला मुलगा म्हटल्या नंतर आईने सुध्दा काही म्हटले नाही परंतु निर्ल्जपणाची कळस गाठत पोटच्या मुलाने बाम लावताना जन्मदात्या आईचाच वाईट नजरेने विनयभंग केला. ही बाब आईच्या लक्षात येताच ती जिवाच्या आकांताने ओरडली यातच मुलाने दाळ घोटण्याच्या रवीने आईच्या डोक्यावर व हातावर मारून जखमी केले. सोबतच घडलेला प्रकार कुठे वाच्यता केल्यास जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली. आईच्या ओरडण्याचा आवाजाणे शेजारी धावून आले. आणि मद्यधुंद मुलाच्या तावडीतून सुटका केली. घडलेल्या प्रकारची तक्रार घाटंजी पोलिस स्टेशन ला दाखल झाल्यावरुन आरोपी दत्तात्रय गावंडे यांचे विरोधात कलम ३५४,३२४,५०४,५०६ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहे. या घटनेने घाटंजी तालुक्यातील समाज मन सुन्न झाली असून अश्या निर्लज्ज मुलावर कठोरात कठोर कारवाई करून मोठ्यात मोठी शिक्षा करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.

Copyright ©