यवतमाळ सामाजिक

माणूसधरी येथिल शेतकऱ्याच्या लुटीतील रक्कम पारवा पोलिसांनी केली परत

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

माणूसधरी येथिल शेतकऱ्याच्या लुटीतील रक्कम पारवा पोलिसांनी केली परत
———————————————
पारवा ठाणेदाराची उत्कृष्ट कामगिरी
———————————————
घाटंजी- तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माणूसधरी येथिल आदिवासी समाजातील शेतकरी लक्ष्मण मोतीराम पेंदोर हे सन २०१५ साली घाटंजी वरून माणूसधरी कडे जात असताना दोन आरोपीने बळजबरीने मारझोड करून रोख रक्कम ११ हजार व एक मोबाईल हिसकावून नेले होते. त्यानंतर पारवा पोलिसांनी त्या आरोपीस अटक करून ती रक्कम जप्त केली. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल सन २०१९ मध्ये देवून जप्त रक्कम संबंधित शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिले होते. मात्र ती रक्कम दोन वर्षांपासून त्या शेतकऱ्यास दिली नव्हती. ही बाब कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांना माहीत होताच त्यांनी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्याला बोलावून त्यांना धनादेश प्रदान केले व त्यांचा जप्तीत असलेला मोबाईल देण्यात आले. त्यामुळे त्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून त्यांनी ठाणेदार चव्हाण यांचे आभार मानले.
शासकीय काम अन बारा महिने थांब या प्रचलित म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी याले असून सुमारे सहा वर्षांपूर्वी जप्त झालेली रक्कम व फिर्यादी व आरोपी मध्ये झालेल्या समझोत्यातून न्यायालयाने १०१९ मध्ये निकाल देत सदर रक्कम त्या शेतकऱ्यास परत करण्याचे आदेश पारित केले. मात्र ती रक्कम पोलीस स्टेशनच्या खात्यात जमा असताना सुध्दा ती रक्कम त्या शेतकऱ्यास परत करण्यात आले नव्हते. मात्र चौफेर नजर ठेवणारे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांनी ती रक्कम परत केली. त्यामुळे त्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या कार्याबद्दल ठाणेदार विनोद चव्हाण यांचे प्रती पारवा पोलीस स्टेशन हद्दी सह घाटंजी तालुक्यातील जनतेकडून समाधान व्यक्त केल्या जात आहेत.

Copyright ©