यवतमाळ सामाजिक

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बाबा कंबल्पोष आर्णी यांच्या उर्स ची तयारी सुरु

 प्रतिनिधी सय्यद अक्रम

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बाबा कंबल्पोष आर्णी यांच्या उर्स ची तयारी सुरु

शमशुल आरेफिन हजरत सय्यद अब्दुल रहमान उर्फ बाबा कंबल्पोष व बच्चू बाबा यांचा उर्स शरीफ येथे पाच फेब्रुवारी ला आहे त्याकरिता बाबा कंबल्पोष ट्रस्टतर्फे तयारीला सुरुवात झालेली आहे आर्णी शहर नव्हे तर जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिक आर्णी च्या ऊर्स ची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे कारण मागील करणामुळे दोन वर्षे भरलाच नाही म्हणून वर्षभराचे आर्थिक बजेट बसविणारा व्यापार करता आला नाही आर्णी तालुक्यातील ठोक व किरकोळ व्यापारी यांच्या दैनंदिन जीवनाच्या दरवर्षीचे आर्थिक चक्र उरस मधील व्यापार झाल्यानंतरच व्यवस्थित होते सगळ्यांच्या आर्थिक व्यवहारात जोर येतो याशिवाय उरुसात कोणतेही अनुचित घटना घडू नये म्हणून दर्गा कमिटी त्यांच्या परीने नियोजन करते त्यासाठी लागणारे सीसीटीव्ही कॅमेरे यात्रेत येणाऱ्यांना लंगर खाना मार्फत जेवणाची व्यवस्था तसेच भाविकांसाठी लागणारी वैद्यकीय व्यवस्था यात्रेदरम्यान दर्गा कमिटी मार्फत केल्या जाते, तसेच पोलीस प्रशासन नगरपरिषद सुद्धा आपल्या परीने संपूर्ण जबाबदारी पार पाडते म्हणून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले बाबांचा उरूस यशस्वीरित्या पार पडतो. तसेच आर्णी परिसरात ग्रामीण भाग जास्त असल्या कारणाने मजूर वर्ग व शेतकरी वर्गात यात्रेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते तसेच कोरूना काळात किरकोळ व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते असे मत प्रत्येक नागरिक व्यक्त करीत आहे अशातच दर्गा ट्रस्ट उरुसाच्या तयारीला लागल्याने सर्व लहान मोठे व्यवसायिक यांच्यासह सर्व नागरिकांमध्ये आनंदमय वातावरण पाहावयास मिळत आहे

Copyright ©