Breaking News यवतमाळ सामाजिक

आज कोरोणा बाधित किती पहा ,इतर विशेष बातम्या सह

आज कोरोणा बाधित किती पहा ,इतर विशेष बातम्या सह

राज्यातील पहिल्या ऑनसाईड जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे

पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

वसंतराव नाईक शासकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे उभारला प्रकल्प

 

यवतमाळ ,दि 28 बायो मेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प साधारणपणे गावाच्या बाहेर स्थापित केलेले आहेत. मात्र वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात राज्यातील पहिलाच ऑनसाईड बायो मेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प

उभारून व्यवस्थीतपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

सदर प्रकल्पाचे वैशिष्ट असे की, या प्रकल्पात वापरल्या जाणारे तंत्रज्ञान हे थर्मल ट्रेंम्परेचर वेस्ट डायरेक्ट डिस्पोजल डायरेक्ट टेक्लनोजीचे असुन हा महाराष्ट्रातील अश्या प्रकारचा व शासकिय महाविद्यालयातील पहिलाच प्रकल्प आहे.

प्रकल्पामध्ये प्रोसेस केल्या जाणा-या बायो मेडेकिल वेस्टमुळे कुठल्याही प्रकारचे वायुजल तथा जमिनीचे कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. या प्रकल्पाची क्षमता दिवसाला 1 टन असुन प्रक्रिया केल्यानंतर केवळ 1 ते 2 किलो राख बाहेर पडते . सदर राख ही सिमेंट फॅक्टरीत विटा बनविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. या प्रकल्पामध्ये विजेचा अत्यंत कमी उपयोग होतो तसेच हा प्रकल्प स्वयंचलीत असुन याला एक व्यक्ती सहज हाताळू शकतो. तसेच हा प्रकल्प सर्जीसोल कंपनीने मेड इन इंडिया अंतर्गत हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

या प्रकल्पासाठी 4.97 कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री यांनी दिला आहे. यापूर्वी रुग्णालयातून बायो मेडिकल वेस्ट अमरावती येथील प्रकल्पात पाठविण्यात येत होते, त्यासाठी महिन्याला किमान 8 लक्ष रुपये खर्च येत होता. वैदयकीय महाविद्यालयाचे यासाठी होणाऱ्या खर्चात आता बचत होणार आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील इतर शासकीय व खाजगी रुग्णालयातील जैव-वैद्यकीय कचऱ्यावर सुद्धा प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

या लोकार्पण सोहळ्याला आमदार वझाहत मिर्झा,आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,

हरिशभाऊ कुडे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद फुलपाटील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार, डॉ.कातकरी, डॉ.रवी राठोड, डॉ.आशिया, डॉ. शेख, डॉ. येलकें, डॉ.गुजर, डॉ.शेंडे उपस्थित होते.

_____________________________________

मुरघास निर्मीती युनिटकरीता अर्थसहाय्य मिळणार

यवतमाळ दि. 28 जानेवारी : जिल्ह्याकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मीती करीता सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्हयातील सहकारी दुध उत्पादक संघ/ संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बतच गट व गोशाळा/ पांजरपोळ संस्था यांना सदर योजनेसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

या योजनेसाठी प्रती युनिट २० लक्ष रुपये खर्चापैकी ५० टक्के म्हणजे १० लक्ष रुपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरीत ५० टक्के १० लक्ष रुपये संस्थेने स्वतः खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा जनजाती क्षेत्र उपयोजनेतील असुन जनजाती क्षेत्र (अनुसुचित जमाती) प्रवर्गातील लाभार्थीसाठी असल्याने योजनेकरीता जिल्हयामध्ये एक युनिट स्थापन करावयाचे आहे. तरी जनजाती क्षेत्र (अनुसुचित जमाती) प्रवर्गातील संस्थांनीच दिनांक ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.एम.यु. गोहोत्रे यांनी केले आहे.

______________________________________

गेल्या 24 तासात 99 पॉझिटिव्ह ; 201 कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1685 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2010

यवतमाळ दि. 28 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 99 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 201 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1964 व बाहेर जिल्ह्यात 46 अशी एकूण 2010 झाली असून त्यातील 76 रूग्ण रूग्णालयात तर 1934 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 969 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 99 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 870 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76866 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 73065 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1791 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 99 रूग्णांमध्ये 32 महिला व 67 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात नऊ, दारव्हा एक, दिग्रस नऊ, घाटंजी तीन, कळंब एक, महागाव एक, मारेगाव पाच, नेर पाच, पांढरकवडा 13, पुसद तीन, उमरखेड तीन, वणी सहा, यवतमाळ 33 व इतर जिल्ह्यातील सात रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 16 हजार 31 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 38 हजार 802 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.42 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 10.22 आहे तर मृत्यूदर 2.33 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1685 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 81 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1685 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 80 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 707 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 1 बेड उपयोगात असून 856 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Copyright ©