यवतमाळ सामाजिक

राज्यातील पहिल्या ऑनसाईड जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे

राज्यातील पहिल्या ऑनसाईड जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे

पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

वसंतराव नाईक शासकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे उभारला प्रकल्प

 

यवतमाळ ,दि 28   बायो मेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प साधारणपणे गावाच्या बाहेर स्थापित केलेले आहेत. मात्र वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात राज्यातील पहिलाच  ऑनसाईड बायो मेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प

उभारून व्यवस्थीतपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

सदर प्रकल्पाचे वैशिष्ट असे की, या प्रकल्पात वापरल्या जाणारे तंत्रज्ञान हे थर्मल ट्रेंम्परेचर वेस्ट डायरेक्ट डिस्पोजल डायरेक्ट टेक्लनोजीचे असुन हा महाराष्ट्रातील अश्या प्रकारचा व शासकिय महाविद्यालयातील पहिलाच प्रकल्प आहे.

प्रकल्पामध्ये प्रोसेस केल्या जाणा-या बायो मेडेकिल वेस्टमुळे कुठल्याही प्रकारचे वायुजल तथा जमिनीचे कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.  या प्रकल्पाची क्षमता दिवसाला 1 टन असुन प्रक्रिया केल्यानंतर केवळ 1 ते 2 किलो राख बाहेर पडते . सदर राख ही सिमेंट फॅक्टरीत  विटा बनविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. या प्रकल्पामध्ये विजेचा अत्यंत कमी उपयोग होतो तसेच हा प्रकल्प स्वयंचलीत असुन याला एक व्यक्ती सहज हाताळू शकतो. तसेच हा प्रकल्प सर्जीसोल कंपनीने मेड इन इंडिया अंतर्गत हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

या प्रकल्पासाठी 4.97 कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री यांनी दिला आहे. यापूर्वी रुग्णालयातून बायो मेडिकल वेस्ट अमरावती येथील प्रकल्पात पाठविण्यात येत होते, त्यासाठी महिन्याला किमान 8 लक्ष रुपये खर्च येत होता. वैदयकीय महाव

Copyright ©