यवतमाळ सामाजिक

वरूड (इजारा) येथिल ठक्कर बाप्पा योजनेतील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.

वरूड (इजारा) येथिल ठक्कर बाप्पा योजनेतील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.

———————————————
आदिवासी विकासाच्या नावावर कंत्राटदाराचेच चांगभले
———————————————
हे काम थांबविण्यासाठी गावकऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार
———————————————
यवतमाळ- आदिवासी समाजाला सन्मानाने जगता यावे. त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. अश्या अनेक उद्देशातून आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत शासन स्तरावरून नानाविध प्रकारे योजना राबवून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी लाखो रुपये खर्ची घालतो मात्र यवतमाळ तालुक्यातील वरुड (इजारा) येथिल ठक्कर बाप्पा योजनेतील सिमेंट रस्त्याचे काम याला अपवाद ठरत आहे. या कामात आदिवासी बांधवाच्या अज्ञानाचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे काम केल्या जात आहेत.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी साठी वरुड (इजारा) येथे ठक्कर बाप्पा योजनेतून सिमेंट रस्त्याचे काम गणेश अंभुरे यांच्या घरापासून ते दमडू कुंभेकर यांच्या घरापर्यंत ७.५ लक्ष रुपयाचे मजूर करण्यात आले. मात्र वास्तवात हे काम स्थळ बदलवून करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी घडले आहे. एवढे असताना सुध्दा जास्तीत जास्त मलिदा लाटण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय मापदंडाला वगळून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून येथिल सिमेंट रस्ता बनविण्यात येत आहे. या रस्त्यात बेड सुध्दा टाकण्यात आले नसून नाल्यातील निकृष्ट रेती, सिमेंट, गिठ्ठी, गज ज्या प्रमाणात पाहिजे तसे नसून ते सुध्दा निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे भविष्यात हा रस्ता जास्त काळ टिकणारा नसून केवळ मलिदा लाटण्यासाठी धातुर मातुर काम केल्या जात आहेत. या कामावर पाणी सुध्दा मारल्या जात नाही आहे. शासकीय बांधकाम म्हटले की संबधित विभागाचे शाखा अभियंता कामाची आखणी करून देवून कॉंक्रीटीकरण करतांना कामावर असणे गरजेचे आहे. मात्र हजर राहणे तर सोडाच कोणत्याही अभियंत्याच्या प्रतिनिधीने सुध्दा या कामाला भेट दिली नाही. सदर सिमेंट रस्त्याचे काम केवळ मजूरदार वर्गाच्या मनाने सुरू असून यावरून या कामाची दर्जा कशी असेल यावरूनच स्पष्ट होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात संबधित विभागाच्या बाबतीत संतापाची लाट उसळली असून येथिल कंत्राटदाराच्या मनाने प्रथम मंजुरात ठिकाणाचे स्थळ बदलविने व नंतर जास्त मलिदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याचे काम करणे यात शासनाच्या निधीचा चुराडा होत असून आदिवासी विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे सदरचे बांधकाम तातडीने थांबवावीत कोणत्याही प्रकारचे देयके देवु नये अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे सह पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता वि.१ यांचे कडे दिले असून सदर कामाची सविस्तर बाबनीहाय चौकशी करून दुसऱ्या कंत्राटदाराकडून उचित दर्जाचे काम करून घ्यावे अशी मागणी आपल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर गावातील आनंदराव लुंगसे, वनिराज चांदेकर, चिंतामण घोटेकर, संजय वाडेकर, मारोती घोटेकर, किशोर चांदेकर, महादेव वाटोळे, खंडू कुंभेकर, उत्तम श्रीरामे या नागरिकांच्या सह्या केलेल्या आहेत.

Copyright ©