यवतमाळ सामाजिक

कुर्ली शाखेच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या रोखपालाचा अपहार उघड.

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

कुर्ली शाखेच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या रोखपालाचा अपहार उघड.
———————————————
रोखपालावर पारवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
———————————————
घाटंजी-काटकसरीने आपल्या घराचा परपंच चालवून दोन पैसे भविष्यासाठी शिल्लक राहावेत असा मानस पुढे करून तो शिल्लक पाडतो. घरी राहिल्यास तो खर्च होईल. घरात सुरक्षित राहणार नाही. म्हणून आपला ज्याठिकाणी भरोसा आहे असे ठिकाण बँक येथे जमा करतो.
मात्र चक्क कुर्ली शाखेच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा रोखपाल गणपत राजेश्वर आसुटकर याने ग्राहकांचे पैसे बँकेत जमा न करता स्वतः हडप करून अपहार केल्याचे पुढे आले आहे.
सन २०२९-२०२० मध्ये फिर्यादी सौ. गिरजा श्रीकृष्ण आडे रा. रोहीपेठ यांनी ५०,००० रुपये तर कुर्ली येथिल पांडुरंग कर्णू मडावी यांनी ४९,९९९ रुपये आपापल्या खात्यात जमा करण्याकरिता विश्वासाने टाकले असता. येथिल रोखपाल गणपत आसुटकर यांनी त्यांच्या खात्यात जमा न करता स्वतः हडप करून अपहार करून फिर्यादिची फसवणूक केली. संबधित ग्राहकाच्या लेखी जबानिवरुन कलम ४०९,३४ भादवी अन्वये पारवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. साधारण२०१९-२०२० मध्ये ज्यांनी कुर्ली शाखेत रक्कम जमा केली परंतू आज रोजी त्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झाली नाही अश्या खातेधारकांनी पारवा पोलीस स्टेशन येथे ८३२९८९९५६५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले आहे.

Copyright ©