यवतमाळ सामाजिक

मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या वाढदिवसा निमित्य निःशुल्क भव्य आरोग्य शिबीर

मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या वाढदिवसा निमित्य निःशुल्क भव्य आरोग्य शिबीर

भाजपा जिल्हा सचिव सुरज गुप्ता यांचे आयोजन

दि.25 जानेवारी 2022 रोजी संत कंवर राम भवन ,वैद्य नगर येथे मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या वाढदिवसानिमित्त निःशुल्क भव्य आरोग्य शिबीर चे आयोजन भाजपा जिल्हा सचिव सुरज गुप्ता यांनी केले होते.
या शिबिराला यवतमाळ शहरातील सुप्रसिद्ध डॉटर्स तसेच मा आ मदनभाऊ येरावार,मा आ.रणजित पाटील,मा आ.मोहनभाऊ मते,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भुतडा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आ.मदनभाऊ नेहमी समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देतात.कोरोना काळात मदन भाऊ यांनी अतिशय तळमळीने व जबाबदारीने प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवा दिली.अशा संवेदनशील आरोग्य सेवकाच्या वाढदिवसाला मोफतआरोग्य शिबीर चे आयोजन करणे हे सर्वात अग्रक्रमी उपक्रम आहे असे आयोजक सूरज गुप्ता यांनी सांगितले.
या शिबिराला डॉ. विजय पोटे,डॉ. महेश शाह,डॉ. निलेश येलनारे, डॉ. दिपक शिरभाते,डॉ.तुषार छत्तानी,डॉ. स्नेहल राशतवार,डॉ.प्रमोद जेठवानी, डॉ.आजोनिश कांबळे,डॉ.नवीन छत्तानी,डॉ.नेहा मुंधडा, डॉ.पूर्वा सावजी(तिवारी),डॉ.संतोष खोकले,डॉ.श्रद्धा राठी,डॉ.विक्रांत कुंभारकर,डॉ.विनय जाधव तसेच पॅरामेडीकल स्टाफ,केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असो. यवतमाळ जिल्हा यांनी निःशुल्क सेवा दिली.
यावेळी भव्य शिबीर मध्ये 887 रुग्णांची नोंदणी झाली.शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांची हृदयरोग,रक्तदाब,सामान्य आजार,जनरल सर्जरी,हाडांसंबंधीतील सर्व आजार,अर्धांगवायू,त्वचाविकार,
नेत्ररोग,कान-नाक-घसा तपासणी,बहिरेपणा तपासणी व श्रवनयंत्रा बाबत माहिती,मुतखडा,लघवीचे त्रास,किडनीचे आजार,हायड्रोसिल, अपेंडिक्स, अपचन,अंगावरील गाठी,स्त्रियांविषयीचे आजार व इतर सर्व आजारांची मोफत तपासणी व मोफत औषधी वाटप करण्यात आले.
यामधील 227 रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे वाटप होणार आहेत तसेच 187 रुग्णांनी मोफत हाडातील कॅल्शियम ची तपासणी करून घेतली तसेच 100 च्या वर रुग्णांची मोफत बेसिक ब्लड टेस्ट व शुगर टेस्ट व 75 रुग्णांची मोफत ई सी जी टेस्ट करून देण्यात आली.तसेच 100 च्या वर रुग्णांची मोफत एक्स रे काढून देण्यात येणार आहे.तसेच शिबिर मध्ये जॉईंट रिप्लेसमेन्ट व ऑर्थोस्कोपी /स्पाईन सर्जरी विषयी मार्गदर्शन व आरोग्य विषयक सर्व शासकीय योजनांन विषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे नियोजन पंकज नानवाणी जिल्हाध्यक्ष,संजय बुरले,गजानन बत्तावार यांनी केले तर शिबिराचे व्यवस्थापन श्रीकांत खडतकर,प्रसाद चौधरी,गजानन भोकरे,उमेश वाधवानी यांनी केले. यावेळी शिबीर मार्गदर्शक भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू पडगीलवार,शहर अध्यक्ष प्रशांत यादव,तालुका अध्यक्ष विरदंडे पाटील ,मनोज इंगोले,सौ.रेखाताई कोठेकर,शैलाताई मिरझापुरे,सौ.कीर्तीताई राऊत,सौ मायताई शेरे,सौ.स्मिताताई भोयटे,सौ रिता धावतोडे, अमोल देशमुख, मोहन देशमुख, किशोर जोतवानी, अजय खोंड, हेमंत दायमा, जुगल तिवारी, राजू मालखेडे शिबिराला उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वप्नील उलंगवार, अजिंक्य शिंदे,आशिष तिवारी, जय चौधरी,सुमित झोपाटे,नयन गुप्ता, अविनाश कदम,साहिल मिश्रा,रोशन खोंडे,अजय चमेडिया,चिन्मय बाळापुरे,ऋषभ बावणे,वेदांग नागोसे,अभिषेक जाधव,मनीष चौधरी,कुणाल हुरेराव,अभि मांडळे, दिपम लेदे,गणेश राठोड,आर्यन राठोड,कृष्णा डफळे,आयुष देशपांडे,मंदार बारडे अथर्व ठाकरे,निलेश खोब्रागडे, शिवम डोईजड,हर्ष डोईजड,रघुवेंद्र चौधरी,निशांत डोईजड,अमित यादव,महेंद्र चांडक,हर्षल चांडक, सुमित लढा यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©