महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथिल राजपथावरील महाराष्ट्राच्या पथसंचलनात यवतमाळ जिल्ह्याच्या युवकाचा हातभार 

  जिल्हा प्रतिनिधी सचिन मोहरकर

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथिल राजपथावरील महाराष्ट्राच्या पथसंचलनात यवतमाळ जिल्ह्याच्या युवकाचा हातभार 
———————————————
जैवविविधता मानके या विषयावर आधारित चित्ररथात यवतमाळच्या मातीतील १८ शिल्प
———————————————
सावरगड च्या युवकांनी यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली 
———————————————
यवतमाळ- संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२२ ला साजरा करण्यात आला. भारताच स्वांतत्र्याच ७५ वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष होता. दरवर्षी प्रमाणे यंदाही राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचालनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संचालनात १२ राज्याचे आणि ९ मंत्रालयाचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जैवविविधता मानके या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. या संचालनात लक्षवेधक ठरले असून यात यवतमाळ जिल्ह्याच्या मातीतील १८ शिल्प असून सावरगड येथिल युवकांचा यात सहभाग असल्याने यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे.
यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस देखणी प्रतिकृती लावली होती. राज्यप्राणी, पक्षी यांच्या लोभस प्रतिकृतीचा समावेश करण्यात आला होता. या चित्ररथाने वाहवाहकी मिळविली यात खासकरून यवतमाळ जिल्ह्यातील १८ शिल्पे होती. यात यवतमाळ घाटंजी रोड वरील सावरगड येथिल तेजस काळे, यश सरगर, रितिक हेमने व योगेश हेमने यांचा यात मोलाचा वाटा आहे. ही बाब सावरगाव वासियासह यवतमाळ जिल्ह्यसाठी अभिमानाची आहे. या शिल्पामुळे यवतमाळ जिल्ह्याचे नाव देशभरात पोहचले असून यात सिंहाचा वाटा असणारे या चित्ररथास हातभार लावणारे सावरगावतील युवकांचे सर्वत्र स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Copyright ©