यवतमाळ राजकीय

युवा मोर्चा महानगर तर्फे नाना पटोले यांचा जाहीर निषेध

युवा मोर्चा महानगर तर्फे नाना पटोले यांचा जाहीर निषेध

देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणे त्यांना संरक्षण देणे हे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सरकारचे धोरण झाले असून त्यांच्यावर टीका केली तर महाराष्ट्रावर टीका केली पण पंतप्रधानांवर टीका केली तर देशाचा अपमान होत नाही का असा सवाल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज उमेश गुजर यांनी करून भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री खासदर संजयजी धोत्रे, भाजपा जिल्हा अध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर, आमदार गोवर्धनजी शर्मा , आमदार वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल , महापौर अर्चनाताई म्हसने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक जयहिंद चौक येथे नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष यांच्या पुतळ्यावर जोडो मारो व त्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करून त्यांना संरक्षण देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधानांची गावगुंड याची तुलना करून नाना पटोले काँग्रेस मध्ये आपला वर्चस्व वाढत असून सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या पासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी व सत्या प्राप्त करण्यासाठी हा आता पद वाचावा यासाठी असे प्रकार करत असल्याचाही आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका केल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते सुप्रियाताई सुळे पासून तर शरद पवार नमाम मलिक ते पृथ्वीराज चव्हाण त्यांची बाजू घेतात परंतु आता पंतप्रधानांवर टीका करताना एकही शब्द का बोलत नाही असाही सवाल भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे यावरून हे सरकार तालिबानी तत्वावर चालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे आज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करून हा प्रकार सहन केल्या जाणार नाही. यामध्ये घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची पायमल्ली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी च्या वतीने करण्यात येत असून कायद्याचा राज्य महाराष्ट्रात नाही यावरून सिद्ध होत आहे का एकाला वेगळा न्याय दुसर्‍याला वेगळे नाही असा प्रकार करण्यात येत आहे गेल्या दोन वर्षात 300 च्यावर लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले सरकारवर टीका करणे हा गुन्हा आहे का या संदर्भात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते बोलतील का आता जनतेच्या दरबारात भारतीय जनता पक्षाने हा प्रश्न नेलाय ओबीसी व सर्वसामान्य व आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी वर टीका करणे हे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे धोरण असल्याचे ही सिद्ध झाल्याचा आहे हा प्रकार सहन केल्या जाणार नाही या प्रकरणावर रस्त्यावर येऊन भारतीय जनता पक्ष जन आंदोलन वरील असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी अक्षय गंगाखेडकर,उमेश गुजर,अभिजित बांगर,निलेश काकड,केशव हेडा,अभिजित भगत,वैभव मेहरे,रितेश जामनेरे,अक्षय जोशी,दीपक कराळे,आनंद दुबे,रुपेश यादव,रुपेश लोहकंपुरे,भावेश सोळंकी,रमेश अलकरी,निलेश निनोरे,अमोल गोगे,नगरसेवक सतीश ढगे,अनिल गरड,दिलीप मिश्रा,अमोल मोहोकर,सुनील बाठे,संजय टीकांडे,वसंता मानकर,किशोर वाघमारे,राहुल धोटे,गोपाळ पाथ्रीकर,आदित्य वानखडे,भय्यू पाटील,विक्की भिसे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©