यवतमाळ सामाजिक

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेत गोविंद इंगोले यांचा सन्मान..

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेत गोविंद इंगोले यांचा सन्मान..
———————————————
घाटंजी-साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंचा अंतर्गत राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत(२०२२) आर्णी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) गोविंद इंगोले यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट दर्जाचे काव्यलेखन करून स्पर्धेत रंगत वाढविल्याने त्यांना सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
गोविंद इंगोले यांना साहित्य लेखनाची आवड सुरवाती पासूनच असून ते आपली नौकरी सांभाळून सदैव चळवळीत राहतात. ते यापूर्वी घाटंजी पंचायत समिती मध्ये कार्यरत असताना सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून गरजवंताना मदतीचे हात पुढे करीत असत. शिक्षणाप्रती ते नेहमीच मार्गदर्शन करीत होते. त्यांनी येथे उत्कृष्ट कार्य बजावले. अश्यातच ते आर्णी पंचायत समिती मध्ये पदोन्नती वर विस्तार अधिकारी म्हणून गेले. आपल्या उत्कृष्ट कार्यशैली चा वापर करून त्यांनी या ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट काव्यलेखन केले. त्यांच्या उत्कृष्ट काव्यलेखनाची दखल घेत साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंचाचे समूह प्रशासक तथा आयोजक विनोद उमरतकर आणि परीक्षक सुभाष कर्डक यांनी एक सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. या सन्मानाने घाटंजी तालुक्यातील त्यांचे चाहते व आर्णी तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केल्या जात आहेत.

Copyright ©