यवतमाळ सामाजिक

शहीद जवानाच्या आईस ध्वजारोहण मान

शहीद जवानाच्या आईस ध्वजारोहण मान

प्रथमच किन्ही तालुका यवतमाळ येथील गावचे सुपुत्र शहिद जवान विक्रांत पंडीतराव भाजीपाले यांच्या आई च्या हस्ते महात्माफुले माध्यमिक विद्यालय किन्ही येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याने विरमातेस या वेळी भावना अनावर झाल्या होत्या किन्ही हे गाव विर अमर जवानाचे गाव म्हणून संबोधण्यात यावे असे मत ज्येष्ठ वेक्ती नी वेक्त केले या

किन्ही गावचे सुपुत्र शहिद जवान विक्रांत पंडीतराव भाजीपाले यांच्या आई च्या हस्ते प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला, किन्ही येथील माध्यमिक विद्यालयाने अशा प्रकारे मान देऊन एक समाजात आदर्श निर्माण केला आहे, यावेळी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात, गावातील विद्यार्थी शुभम शालिकराव कुलरकर आणि पवन गजानन कुलरकर या दोन्ही भावंडाचा महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने जाहिर सत्कार करण्यात आला, यावेळी सुगत शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव यु. पी. इंगोले उपाध्यक्ष अमित यु. इंगोले. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय किन्ही येथील मुख्याध्यापिका कु. जयश्री यू. इंगोले स. शिक्षक . सोळंके ओंकार , कु. पद्मा आगरकर , शिक्षकेतर कर्मचारी श्रीकृष्ण मरगडे, एस. डी. राठोड , नितेश अगरकर व समस्त गावकरी उपस्थित होते.

Copyright ©